पनवेल : महिलांच्या त्रिकुटाने गि-हाईकाच्या बहाण्याने पनवेल शहरातील एका सोन्याच्या पेढीवरील कर्मचा-यांना बोलण्यात गुंतवून पावणे दोन लाखांना लुटले आहे. रविवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सूमारास ही घटना घडली. याबाबत पनवेल शहर पोलीसांनी रितसर गुन्हा नोंदविला असून पोलीस संशयीत महिलांचा शोध घेत आहेत. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पनवेल शहरातील जोशी आळीतील एच.एम. पटेल ज्वेलर्स या सराफाच्या दूकानात रविवारी सकाळी १० वाजून २४ मिनिटांनी सोन्याचे कानातले घेण्यासाठी तीन महिना गि-हाईक दूकानात आल्या. त्यावेळी दूकानात दोन कर्मचारी काम करत होते. दोन्ही कर्मचा-यांना बोलण्यात गुंतवून आणि इतर दागीने पहाण्याच्या बहाण्याने या संशयीत महिलांनी १ लाख ८५ हजार रुपयांचे दागीने हातचलाखीने चोरी केली.

हेही वाचा…रेल्वे स्थानकांत ज्येष्ठांचे हाल उरण, द्रोणागिरी,न्हावा शेवा, शेमटीखार स्थानके उद्वाहनाविना

तीन महिलांमध्ये दोघींचे वय ३० ते ३५ वर्षे आणि एकीचे वय ५५ ते ६० वर्षे असल्याचा अंदाज पोलीसांना दिलेल्या तक्रारीत सराफ दूकानातील कर्मचा-यांनी पोलीसांकडे वर्तविला आहे. अवघ्या सहा मिनिटांत चोरी करुन या महिला दूकानातून पसार झाल्यामुळे या महिला सराईत चोरी असल्याचे बोलले जात आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Panvel three woman stolen rs 1 85 lakh and jewels from gold jewellery shop sud 02