उरण : दोन वर्षांपासून बंद असलेली उरण ते पनवेल बोकडवीरा मार्गे बस सोमवारी सकाळी ६.५५ वाजता सुरू करण्यात आली आहे. यासाठी जनवादी महिला संघटनेने अनेक दिवसांपासून या मागणीचा पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. उरण पनवेल राज्य महामार्गावरील सिडको कार्यालया नजीकचा फुंडे पूल नादूरुस्त झाल्यामुळे मागील दोन वर्षे उरण बोकडविरा मार्गे एसटी प्रवासी सेवा बंद केली आहे. त्यामुळे बोकडविरा,पाणजे, फुंडे, डोंगरी,म.रा.वि.म.वसाहत मधील विद्यार्थ्यांना, कामगार, सर्वसामान्य प्रवासी, रोजगाराला जाणाऱ्या महिलांना आर्थिक त्रास सहन करावा लागला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागरिकांनी वारंवार  हा पुल दूरूस्त करण्यासाठी सिडको कडे मागणी करून देखील अनेक कारणं पुढे करून सिडको अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. म्हणून पर्यायी रस्ता तयार असल्याने पूल दुरुस्ती होई पर्यंत  अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने बोकडवीरा मार्गे एसटी बस सुरू करण्याची मागणीसाठी दोन वर्षे पाठपुरावा केला आहे. याकरिता ३० जूनला मुंबई येथे मुख्यालयात निवेदन देऊन बोकडविरा मार्गे एस.टी.बसाचा मार्ग करण्यात यावा अशी मागणी केली.त्याचा गेली तीन महिने पाठपुरावा केला.

हेही वाचा >>> नवी मुंबई: पोलीस असल्याचे सांगत पैसे उकळणाऱ्या तिघांना अटक

उरण तहसीलदार, आणि आगार व्यवस्थापक यांच्याकडेही सातत्याने बैठक घेतल्याने अखेर सोमवार पासून उरण ते पनवेल व उरण दादर या दोन मार्गावरील बसेस सुरू करण्यात आल्याचे मत अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष हेमलता पाटील यांनी दिली आहे. या मार्गावरील बस सेवा पूर्ववत सुरू करण्यात आली  असून सकाळी ६.५५ वाजताची पहिली उरण बोकडवीरा मार्गे पनवेल ही बस सुरू करण्यात आली असल्याची माहिती उरण आगार प्रमुख अमोल दराडे यांनी दिली आहे. त्यानुसार उरण – पनवेल बोकडवीरा मार्गे सकाळी ६.५५,८.०० ,८.०५, ९.१० वाजता तर दुपारी १६.१५,१७.२०,१७.३०,१८.३५ वाजता तर उरण दादर बोकडवीरा मार्गे सकाळी ७.३० ,९.२५,९.३०,११.२५ वाजता,दुपारी १५.३०,१७.२५,१७.३०,१९.२५ या वेळा पत्रकानुसार या दोन्ही मार्गावर एसटी बस सुरू करण्यात आली आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Panvel uran via bokadweera st service started after two years ysh
Show comments