पनवेलमधील गणेश विसर्जनादरम्यान नूकतीच 11 जणांना विजेचा झटका लागला होता. या घटनेवेळी प्रसंगवधान ठेऊन या ठिकाणी कर्तव्यदक्षपणे राज्य राखीव पोलीस दलाचे (एस. आर. पी. एफ.) तीन जवान आणि पनवेल शहर पोलीस ठाण्याचे दलाच्या दोन अधिकारी यांनी वेळीच जनरेटरमधून सूरु असलेल्या विजप्रवाह वाहिनी बाजूला केल्याने या ठिकाणी बाप्पाला अखेरचा निरोप देण्यासाठी उभी असलेली पाचशे जण विजझटक्यापासून वाचू शकले. नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी या पाचही देवदूतांचे कौतूक केले आहे. पनवेलमधील विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी पोलीस ठाण्यात जाऊन पोलीसांचे कौतूक करत आहेत.
पनवेलमधील कोळीवाड्याशेजारी घरगुती गणेशमुर्तींचे विसर्जनासाठी पालिकेने जनरेटरच्या विजेवर या परिसरात रात्री अंधार होऊ नये म्हणून विजेचे हँलोजन दिवे लावले होते. जनरेटर टेम्पोमध्ये होता तर हँलोजनचे दिवे खांबांना बांधलेले होते. विसर्जनावेळी पाऊस मोठ्या प्रमाणात दुपारपासून सूरुच होता. त्यामुळे विजेच्या तारा एकमेकांना बांधलेल्यामध्ये विजप्रवाह उतरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जनरेटरमधून येणारी विजप्रवाहाची तारेचा झटका पहिले कुटूंबातील एका सदस्याला लागल्यावर नेमके काय झाले हे कळण्याच्या आतच सूमारे 10 जणांना विजेचा झटका लागला होता. गणेशभक्तांची धावपळ सूरु झाली होती. एकीकडे सर्वत्र खळबळ माजली असताना या विसर्जन स्थळी शांतता राखण्यासाठी कर्तव्यावर असणारे पनवेल शहर पोलीस ठाण्याचे निरिक्षक संजय जोशी, सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवाजी हुलगे यांच्यासह एस.आर.पी. एफ.च्या गोरेगाव ब तुकडीचे उत्तम बबन चातशे, प्रशांत भाऊसाहेब साबळे, सागर जाधव यांनी घटनेतील गांर्भीय ओळखलेल्या पोलीसांनी सर्वप्रथम विजेचा झटक्यामुळे हा सर्व गोंधळ उडाल्याची खात्री काही क्षणात केली.
त्यानंतर मिळेल त्या लाकडी वस्तू, दांडक्यांनी विजेपासून सगळ्यांना दूर केले. सुरुवातीला ज्याला विजेचा पहिला झटका लागला त्यानंतर एकमेकांना स्पर्श झाल्याने 11 जणांपर्यंत विजेचा झटका बसला. यामध्ये नऊ महिन्याच्या बाळापासून ते 68 वर्षांच्या जेष्ठांपर्यंत भाविक तोपर्यंत जखमी झाले होते. या सर्व धावपळीत विजेच्या झटक्यामुळे अजून भाविक बाधित होतील अशी शक्यता ध्यानात घेऊन एसआरपीएफचे जवान व पोलीस अधिका-यांनी दूसरी धाव घेतली ती विजप्रवाह सूरु असलेल्या वीजवाहिनीकडे जनरेटरचा ऑपरेटर त्यावेळी नव्हता.
हेही वाचा : पनवेलमध्ये ‘लालबागचा राजा’ ; ३० वर्षांपासून केली जातेय प्रतिष्ठापना
ज्या टेम्पोतून जनरेटर आला होता. त्या टेम्पोचालकाला सावधान करण्यात आले. टेम्पोचालक जनरेटची कळ बंद करेपर्यंत सतर्क पोलीसांनी विजप्रवाह सूरु असलेली वाहिनी नागरिकांपासून दूर फेकली आणि मोठा अनर्थ टळला. सध्या पोलीस ठाण्यात याच सतर्क आणि कर्तव्यदक्ष पोलीसांची चर्चा सूरु आहे. पोलीसांनी या प्रकरणी संबंधित मंडप डेकोरेशनचा ठेका घेतलेल्या कंपनीवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच या घटनेतील १० जखमींना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे. तर मानस कुंभार हा या घटनेनंतर बेशुद्ध होता. त्याचीही प्रकृती आता बरी असल्याची माहिती पालिकेचे प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी रेहना मुजावर यांनी दिली.