गुरुवारी शाळेबाहेर नो एन्ट्री आंदोलन तर सोमवारी पालिका मुख्यालयातच शाळा भरवण्याचा इशारा
संतोष जाधव, लोकसत्ता
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नवी मुंबई महापालिकेत पालिकेच्या सीबीएसई शाळांचा टेंभा मिरवणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचा नियोजन शून्य कारभार समोर आला आहे. गेल्या वर्षभरापासून शिक्षकांचा तुटवडा जाणवणाऱ्या कोपरखैरणे येथील पालिकेच्या सीबीएसई शाळेत आवश्यक शिक्षक संख्येअभावी सोमवारपासून शाळा एक दिवसाआड चालवण्याची नामुष्की ओढवली आहे.गेल्यावर्षापासून पालकांना व विद्यार्थ्यांना फक्त शिक्षक मिळतील अशी आश्वासनांची पाने पुसणाऱ्या पालिकेविरोधात गुरुवारी पालकांनी शाळेबाहेरच शाळेत प्रवेश बंद आंदोलन करण्याचा इशारा पालिका प्रशासनाला दिला आहे. तर सोमवारी पालिका मुख्यालयातच शाळा भरवली जाणार आहे. त्यामुळे कोपरखैरणेतील सीबीएसई शाळेतील शिक्षकांच्या तुटवड्याचा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आला आहे.
मागील वर्षभरापासून अपुऱ्या शिक्षक संख्येअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. नवे शैक्षणिक वर्ष सुरु झाले तरी फक्त आश्वासनच दिले जात असून १३७५ विद्यार्थ्यांना फक्त ५ शिक्षक आहेत. त्यामुळे कशीबशी शाळा चालवण्यासाठी पहिली दुसरीचे वर्ग सोमवार बुधवार शुक्रवार या दिवशी तर तिसरी ते पाचवी चे वर्ग मंगळवार गुरुवार शनिवारी भरवण्यात येत आहे. सहावीचा वर्ग मात्र दररोज शाळेत बोलवण्यात येणार आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या सीबीएसई शाळांचा श्रीगणेशा ४ ऑगस्ट २०१८ पासून झाला. सीवूड्स व कोपरखैरणे येथे पालिकेच्या २ सीबीएसई शाळा पालिकेने सुरु केल्या. पण अपुऱ्या शिक्षकांअभावी पालिका चालवत असलेल्या कोपरखैरणेतील सीबीएसई शाळेतील शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. तर दुसरीकडे पुण्यातील आकांक्षा संस्थेद्वारे चालवण्यात येणारी सीवुडस येथील शाळा मात्र अत्यंत व्यवस्थितपणे सुरू आहे.१५ जूनपासून राज्यभरातील शाळा सुरू झाल्या आहेत.परंतु नव्याने सुरु झालेल्या शैक्षणिक वर्षातही पुरेसे शिक्षक नसल्याने कोपरखैरणे येथील सीबीएसई शाळा सोमवारपासून एक दिवसाआड भरण्याची नामुष्की ओढवली आहे. सीवूड्स येथील आकांक्षा संस्था चालवत असलेल्या शाळेत सुमारे ११५० विद्यार्थ्यांना ५२ शिक्षक व ७ मदतनीस तर कोपरखैरणेत १३७५ विद्यार्थ्यांना फक्त ५ शिक्षक आहेत.
एकंदरीत सर्व शिक्षा अभियानांतर्गत ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक अशी नियमावली असताना कोपरखैरणे येथील सीबीएसई शाळेत इयत्ता चौथीचे १३० विद्यार्थी इयत्ता पाचवी चे १४० विद्यार्थी यांना १ शिक्षक याप्रमाणे हॉलमध्ये शिक्षण घेण्याची वेळ महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या गलथान कारभारामुळे ओढवली आहे.मागील वर्षभर शिक्षक भरती करण्यासाठीचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच आहे.
कोपरखैरणे येथील सीबीएसई शाळेत शिक्षक संख्या कमी असल्याने लवकरात लवकर त्या ठिकाणी शिक्षकांची नेमणूक करण्याचा पालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे.
दत्तात्रय घनवट , उपायुक्त शिक्षण विभाग
किती दिवस आमच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान करणार.?
गेल्यावर्षापासून आमच्या विद्यार्थ्यांचे शिक्षकांअभावी शैक्षणिक नुकसान केले जात आहे. पालिकेच्या सीवूड्स येथील शाळेला चालवण्यासाठी संस्था, शिक्षक मिळतात. पण कोपरखैरणे येथील शाळेला संंस्था व शिक्षक का मिळत नाही.त्यामुळे आता डोक्यावरुन पाणी गेले आहे. गुरुवारी शाळेत आवश्यक तेवढे शिक्षक द्या नाहीतर शाळेत पालक व विद्यार्थ्यासमवेत शाळेच्या प्रवेशद्वारावरच आंदोलन करण्यात येणार आहे.तर सोमवारी २६ तारखेला पालिका मुख्यालयावरच विद्यार्थी व पालकांचा मोर्चा घेऊन त्याठिकाणी पालिका आयुक्त दालनातच सीबीएसई शाळा भरवणार आहे.
– रेणूका म्हात्रे, पालक प्रतिनिधी