नवीन पनवेल वसाहतीतील सेंट जोसेफ विद्यालयाने केलेल्या शुल्कवाढीविरोधात ४०० पालकांनी मुख्याध्यापिकांना घेराव घातला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शुल्कवाढीच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पालकांसोबत बैठक घेण्याचे व्यवस्थापनाने मान्य केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना त्यांचे प्रगतिपुस्तक घेण्यासाठी शनिवारी शाळेत बोलावण्यात आले होते. त्यावेळी अचानक शुल्कवाढ केल्याची माहिती मिळताच पालक संतप्त झाले. त्यांनी शाळा व्यवस्थापनाविरुद्ध घोषणाबाजी सुरू केली. पालकांच्या या आंदोलनात काही स्थानिक राजकीय पुढारीही सामील झाले होते. पालकांची घोषणाबाजी सुरूच राहिल्याने काही वेळाने पोलिसांना पाचारण करण्यात आले.दरम्यान, शुल्कवाढ अन्यायकारक पद्धतीने करण्यात आली नसल्याचा दावा मुख्याध्यापिका सईदा यांनी केला आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parents anger on principal