नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील सर्वात मोठी समस्या म्हणजे शहरात नागरीकांना वाहने उभी करकण्यासाठी जागाच नाहीत. त्यामुळे शहरभऱ बेकायदा पार्किंग झाल्याचे पाहायला मिळत आहे. भविष्यात हीच समस्या आणखी गंभीर स्वरुप धारण करणार असल्याचे चित्र आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पार्कींग नियोजनासाठी सिडकोकडे महानगरपालिकेमार्फत वारंवार पाठपुरावा केला जात आहे. या दोन्ही आस्थापना आवश्यक तेवढ्या पार्किंग सुविधा पुरवण्यासाठी अपयशी ठरत असल्याचे दिसत असून पार्किंग नियोजनाचा बट्ट्याबोळ झाला आहे.

पालिकेला सिडकोमार्फत पार्कींग सुविधेकरिता सीबीडी बेलापूर विभागात २ आणि वाशी विभागात १ भूखंड उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्यातील बेलापूर येथे ४७६ चारचाकी व १२१ दुचाकीसाठी पालिकेने बहुमजली पार्किंगची व्यवस्था तयार केली असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. पार्किंगसाठीचे वाहनतळ पुढील ३ महिन्यात सज्ज होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेच्यावतीने बेलापूर सेक्टर १५  येथील भूखंड क्रमांक ३९ वर बहुमजली वाहनतळ विकसित केले असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. याकामाची पालिका आयुक्तांनी नुकतीच पाहणी केली आहे. बेलापूर येथे साकारण्यात येत असलेल्या बहुमजली वाहनतळात ४७६ चारचाकी वाहने व १२१ दुचाकी वाहने पार्कींगसाठी उपलब्ध करून देण्यात आली असून सेक्टर १५ येथील कै. नागा गना पाटील उद्यानासमोरून पूर्व दिशेला वाहनतळात येण्यासाठी प्रवेशव्दार ठेवण्यात आलेले आहे.

thane creek bridge 3 mumbai pune traffic latest marathi news
विश्लेषण: तिसऱ्या ठाणे खाडी पुलामुळे मुंबई-पुणे वाहतूक सुरळीत होणार… प्रकल्प सेवेत कधी?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
thane traffic marathi news
ठाणे: विसर्जन सोहळ्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज, शहरात वाहतूक बदल
which provides wi fi service at 6112 railway stations across the country
नागपूर : ‘नवरत्न’ म्हणजे काय? रेल्वेच्या ६,११२ स्थानकांवर ‘वाय-फाय’सेवा देणारी कंपनी कोणती?
velankanni, passengers going to velankanni,
वेलांकन्नी येथे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय
Roads Alibaug, MMRDA, Alibaug tourists,
अलिबागमधील दहा गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचा विकास होणार, एमएमआरडीए ३२५ कोटी रुपये खर्च करणार, पर्यटकांना दिलासा
Thane Multi Storey vehicle Parking
ठाणे : वागळे इस्टेटमधील बहुमजली वाहनतळाची क्षमता वाढणार
tap water Water cut off in some parts of Thane on Wednesday x
ठाण्याच्या काही भागात बुधवारी पाणी नाही; पाणी नियोजनामुळे २४ ऐवजी १२ तासांचे पाणी बंद

हेही वाचा >>> नेरुळमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५ लाखांचा सिंहासनारूढ पुतळा उभारणार; ठाणे जिल्हाधिकाऱ्यांचीही मिळाली परवानगी

वाहनतळाच्या लगत महावितरणाचे इलेक्ट्रीकल सबस्टेशन असल्याने त्याचा विचार करूनच व त्यानुसार इमारतीच्या आराखड्यामध्ये अत्यावश्यक बदल करून हे बहुमजली वाहनतळाचे काम करण्यात येत आहे. सीबीडी बेलापूर विभागातच आणखी एक वाहनतळाची जागा  उपलब्ध करून देण्यात आली असून त्याठिकाणी सदस्यस्थितीत डांबरीकरण करून तसेच वाहने उभी करण्यासाठी पट्टे मारून भूखंडावर वाहनतळ विकसित करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येणार आहे.शहरातील पार्किंग सुविधेबाबत सिडकोकडून मिळालेल्या पार्किंगच्या भूखंडाबाबतही पार्किंग सुविधा निर्माण करण्याबाबत नियोजन करण्यात आल्याची माहिती शहर अभियंता संजय देसाई यांनी लोकसत्ताला दिली.

नवी मुंबई शहरात पार्किंगची व्यवस्था करण्यासाठी पालिका प्रयत्नशील असून पार्किंगबाबत योग्य नियोजन व आराखडा बनवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वाढती वाहनसंख्या पाहता पार्किंगबाबतही सुविधा निर्माण करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.

-राजेश नार्वेकर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका