नवी मुंबई : करोना काळात झालेल्या  विधी शाखेच्या ऑनलाईन परीक्षेत एक निष्णात वकीलाचीच मदत घेत उत्तीर्ण झालेल्या महिलेच्या विरोधात तिच्या मुलीनेच तक्रार केली आहे. या बाबत गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.मनाली गवळी असे यातील आरोपी महिलेचे नाव आहे. तिने २००५ मध्ये वांद्रे येथील रिझवी विधी महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. टाळेबंदीच्या काळात ऑनलाईन परीक्षा झाल्या त्यावेळी सदर महिलेने तिच्या ओळखीचे सिद्धार्थ गायकवाड यांची मदत घेऊन परीक्षा दिली होती. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी  असा अर्ज त्यांची मुलगी डॉ. स्नेहल गवळी यांनी चित्रा साळुंके या वकिलाच्या मार्फत पोलीस आयुक्तांना केला होता. या अर्जाच्या अनुषंगाने सिद्धार्थ आणि मनाली यांच्या विरोधात नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे.

प्रकरण नेमके काय आहे ?
आरोपी मनाली हिने टाळेबंदी काळात झालेल्या विधी शाखेच्या परीक्षेत सारसोळे येथे तिचा मित्र सिद्धार्थ गायकवाड याला बोलावून घेतले होते व परीक्षा देताना मोबाईलचा कॅमेरा बंद करून तिच्या वतीने गायकवाड याने उत्तर पत्रिका सोडवली होती या परीक्षेत मनाली ही उत्तीर्ण झाली होती यामुळे मुंबई विद्यापीठाची फसवणूक झाली असल्याने गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यातील आरोपीने तिचा मित्र असलेला एका पोलीस अधिकाऱ्याच्या मदतीने हे सर्व केले आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली. 

Akola Sessions Court sentenced family to death citing Mahabharata High Court disagreed
‘महाभारताचा’ उल्लेख करत फाशीची शिक्षा, उच्च न्यायालयाचे सत्र न्यायालयावर ताशेरे…
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Bombay HC Nagpur Bench News
High Court : अल्पवयीन पत्नीशी संमतीनं ठेवलेले शरीरसंबंधही बलात्कारच; मुंबई हायकोर्टाचं १० वर्षांच्या शिक्षेवर शिक्कोमोर्तब
PET, LLM, Admit Card, Pre-Entrance Exams,
‘पेट’ आणि ‘एलएलएम’ प्रवेशपूर्व परीक्षांचे प्रवेशपत्र विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध, विविध केंद्रावर १७ नोव्हेंबरला ऑनलाईन परीक्षा
mpsc exam preparation
MPSC मंत्र : राज्य सेवा मुख्य परीक्षा- मानवी हक्क पारंपरिक अभ्यास
Shocking video Year Old Boy Slaps Mother Repeatedly After Finding Her Over Drug Use
पोटच्या मुलानं आईला भररस्त्यात बेदम मारलं; कारण ऐकून नेटकरी म्हणाले बरोबर केलं; VIDEO पाहून सांगा तुम्हाला काय वाटतं
Cobra bite while performing a dance shocking video goes viral on social media
VIDEO: जिवाशी खेळ कशाला? विषारी सापासोबत डान्स अंगाशी आला; लाइव्ह स्टेजवरच महिलेला कोब्रा डसला