नवी मुंबई : करोना काळात झालेल्या विधी शाखेच्या ऑनलाईन परीक्षेत एक निष्णात वकीलाचीच मदत घेत उत्तीर्ण झालेल्या महिलेच्या विरोधात तिच्या मुलीनेच तक्रार केली आहे. या बाबत गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.मनाली गवळी असे यातील आरोपी महिलेचे नाव आहे. तिने २००५ मध्ये वांद्रे येथील रिझवी विधी महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. टाळेबंदीच्या काळात ऑनलाईन परीक्षा झाल्या त्यावेळी सदर महिलेने तिच्या ओळखीचे सिद्धार्थ गायकवाड यांची मदत घेऊन परीक्षा दिली होती. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असा अर्ज त्यांची मुलगी डॉ. स्नेहल गवळी यांनी चित्रा साळुंके या वकिलाच्या मार्फत पोलीस आयुक्तांना केला होता. या अर्जाच्या अनुषंगाने सिद्धार्थ आणि मनाली यांच्या विरोधात नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in