पनवेल : पनवेल रेल्वेस्थानकात धावत्या रेल्वेत चढणा-या प्रवाशाचा तोल गेला आणि पलाट व रेल्वेच्या मध्ये तो येणार इतक्यात रेल्वेसूरक्षा रक्षकाने त्याला ओढून बचावले. ही घटना रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सूमारास पनवेल स्थानकात पलाट क्रमांक 7 वर घड़ली. पनवेल रेल्वे स्थानकात नेत्रावती एक्सप्रेस पकडण्यासाठी प्रवासी जावेद सलीम यांना काही मिनिटे उशीर झाला. त्यांच्या दोनही हातामध्ये आणि पाठीवर पिशव्या असल्याने ते पिशवी घेऊनच धावती रेल्वे पकडण्यासाठी पळत होते.
यामध्ये पहिली हातातील पिशवी सलीम यांनी धावत्या रेल्वेच्या दरवाज्यात ठेवली त्यानंतर पिशव्या घेऊन रेल्वेत प्रवेश करताना त्यांचा तोल गेला. आणि ते फलाट व रेल्वेच्यामधल्या पोकळीत सापडले. याच दरम्यान समोरून धावत आलेल्या रेल्वे सुरक्षा रक्षक दिनेश यादव यांनी त्यांचा हात पकडून त्यांना बाहेर ओढले. रक्षक दिनेश यांच्या काही क्षणातील धाडसामुळे मोठी जिवीतहाणी टळली. सूरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिका-यांनी आणि स्थानकात उपस्थित इतर प्रवाशांनी दिनेश यांच्या कामाचे कौतुक केले.