शनिवारी एन एम एम टी ची नवी मुंबईतील जुईनगर स्थानक ते कोप्रोली ही बस लॉक झाल्याने खोपटे पूल चौकात बंद पडली आहे. त्यामुळे भर पावसात या बस मधील प्रवाशांना त्रास सहन करावा लागला आहे. तर दुसरीकडे ही बस प्रचंड वाहतूकीचे ठिकाण असलेल्या चौकात बंद पडल्याने वाहनचालकाना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. पावसात इलेक्ट्रिक बस बंद पडण्याच्या घटनांत वाढ : नवी मुंबई महानगर पालिकेच्या एन एम एम टी सेवेच्या बसेस उरण पर्यंत येत आहेत. यातील अनेक बस या पावसामुळे बंद पडू लागल्याने येथील प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्याचप्रमाणे पावसात या बस बंद पडण्याचे प्रमाण अधिक असल्याचे वाहन चालकांचे म्हणणे आहे.