पनवेल: रायगड जिल्ह्यातील सहा मुख्य नद्यांपैकी चार नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. जिल्हाधिका-यांनी बुधवारी पहाटे अतिवृष्टीचा आढावा घेऊन जिल्ह्यातील महाविद्यालये व शाळेंना सुट्टी जाहीर केली. सावित्री, अंबा, कुंडलिका आणि पाताळगंगा या नद्यांनी इशारा पातळी ओलांडून धोक्याची पातळी गाठली. रायगड जिल्ह्याच्या पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनूसार पनवेलमधून वाहणारी गाढीनदी अजूनही निम्म्या पातळीवर वाहत असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे पनवेलमध्ये अतिवृष्टीच्या दूस-या दिवशीही सखल ठिकाणी पाणी साचण्याचे प्रमाण कमी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खालापूर तालुक्यातील पाताळगंगा नदीने धोका पातळी ओलांडल्याने आपटा गाव आणि रसायनी परिसरात सखल भागात दोन फूटापेक्षा अधिक पाणी साचले आहे. आपटा गावात प्रवेश करण्यासाठीच्या रस्त्यावर पाणी साचल्याने गावातून येजा कशी करावी असा प्रश्न गावक-यांना पडला आहे.पाताळगंगा नदीची इशारा पातळी २०.५० मीटर असून धोक्याची पातळी २१.५२ मीटर आहे. परंतू सध्या पाणी रस्त्यावर आले आहे. परंतू जिल्ह्याच्या पूरनियंत्रण कक्षाने जाहीर केलेल्या माहितीनूसार गाढी नदीची इशारा पातळी ६ मीटर असून धोक्याची पातळी साडेसहा मीटर आहे.

हेही वाचा >>>नवी मुंबई विमानतळ कधी सुरू होणार? गौतम अदाणींनी जाहीर केली तारीख

परंतू अजूनही नदीपात्रात ३.६० मीटर पाणी असल्याने पनवेलकर सूखरुप आहेत. २००५ च्या पूरामध्ये गाढी नदीला पूर आल्याने पनवेल शहर व कळंबोली वसाहतीमध्ये ८ ते १० फूट पाणी २४ तास साचले होते. मागील पूराचा धडा घेऊन पनवेल शहरातील गाढी नदीकाठी स्थिरावलेल्या कोळीवाड्यातील शेकडो नौका कोळीबांधवांनी किना-यावर घेतल्या असल्याची माहिती कोळीवाड्यातील गायक गणेश भगत यांनी दिली.पनवेल पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी आपत्कालिन परिस्थितीत रहिवाशांना संपर्कासाठी १८००२२७७०१ हा टोल फ्री क्रमांक आणि पालिकेच्या नियंत्रण कक्षासाठी ०२२-२७४५८०४० ,४१,४२ किंवा ०२२-२७४६१५०० हे क्रमांक जाहीर केले आहेत.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Patalganga river crossed the danger level while water in gadhi river below the warning level amy