नवी मुंबई शहर व आजुबाजुच्या परिसराला मोठे महत्व प्रप्त झाले आहे. नवी मुंबई शहरात सीवूड्स स्थानकानजीक पूर्वेला होत असलेल्या परिसरात एल अॅन्ड टी कंपनीने पालिकेकडून कंपनीच्या सामाजिक दायित्व फंडातून या पदपथाची देखभाल व दुरुस्त करण्याची परवानगी मागीतली होती. त्याप्रमाणे पालिकेने कंपनीला ९ अटी घातल्या असून त्या अटीं चक्क बासनात गुंडाळून सीवूड्स पूर्वेला चक्क फुटपाथच वाढवून २ फुटांच्या रस्त्याचाच पदपथ करुन टाकला आहे. विशेष म्हणजे पालिकेचे या कामाकडे पूर्णतः दुर्लक्ष असून पालिका अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार करुनही पालिका अधिकारी कारवाईकडे दिरंगाई करीत असल्याचे लोकसत्ताने निदर्शनास आणल्याने आता येथील काम थांबवण्यात आले आहे. याबाबतची सुनावणी २१ फेब्रुवारीला होणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हेही वाचा- नवी मुंबईची डबल डेकर बस सेवा मे मध्ये सुरू होणार, ११ बस ताफ्यात दाखल

Municipal Corporation takes action against 71 unauthorized stalls in Kolhapur news
कोल्हापुरात अतिक्रमण विरोधी मोहीम
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Traffic changes due to flyover work at Savitribai Phule Pune University Chowk Pune news
पुणे: विद्यापीठ चौकातील वाहतुकीत बदल
Thane Traffic Branch, Thane Police ,
ठाणे वाहतूक शाखेच्या विभाजनाचा प्रस्ताव, वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी ठाणे पोलिसांची निर्णय
roads Mumbai roads mechanical sweepers mumbai,
मुंबईतील रस्ते आणखी चकचकीत, मार्चपर्यंत १५ यांत्रिकी झाडू, कचरा उचलणारी यंत्रे घनकचरा विभागाच्या ताफ्यात
Tuljapur Temple Vikas Arakhada loksatta news
२१०० कोटींचा तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखडा मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांकडे सादर, आमदार पाटील यांची माहिती
mmrda planned various road projects to solve traffic congestion problem in thane kalyan and navi mumbai
ठाणे, कल्याण, नवी मुंबईतील रस्ते प्रकल्पांना गती; वाहतूक सुधारणा प्रकल्पांबाबत पार पडली महत्वाची बैठक
Fast paced concreting on Madh Marve road in Malad is causing traffic congection
मढ मार्वे मार्गावरील रस्ते कामात नियोजनाचा अभाव, वाहतूक कोंडीमुळे पाऊण तासाच्या प्रवासासाठी अडीच तास प्रतीक्षा

नवी मुंबई शहरात झपाट्याने व वेगवान पध्दतीने वाढणाऱ्या सीवूड्स रेल्वेस्थानकाच्या पूर्व पश्चिम दिशेला सीवूड्स परिसरातील भव्य मॉल व कोटींची उड्डाणे घेणारा गृहनिर्माण प्रकल्प उभारला आहे. सीवूडस पूर्व दिशेला कंपनीने हजारो घरांचा प्रकल्प उभारला असून अद्याप या भागात मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरु आहे. एल अॅन्ड टी कंपनीच्या या दिशेला असलेल्या फेज १ प्रकल्पातील इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. सीवूड्स सेक्टर २५ येथील या गृहनिर्मिती प्रकल्पाच्या बाजुलाच असलेल्या पदपथाचे सौंदर्यीकरण व देखभाल सामाजिक दायित्व फंडातून करण्यासाठी परवानगी मागीतली व पालिकेने त्यांना परवानगी दिली. परंतू परवानगी दिल्यानंतर. कंपनीने सामाजिक दायित्व फंडाच्या नावाने पदपथाच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेऊन चक्क पदपथच २ फूट रस्त्यात वाढवून रस्ताच छोटा केला आहे. ही बाब पालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणल्यानंतर विभागातील नागरीक तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी यांनीही तक्रार दिल्यानंतर पालिकेने याबाबत सुनावणी ठेवली आहे.

हेही वाचा- नवी मुंबई : पाण्याअभावी व्हर्टिकल गार्डन प्रयोग ठरतोय अपयशी ? दरवर्षी होतोय लाखो रुपयांचा चुराडा

एल अॅन्ड टीचा प्रकल्प होत असलेल्या या भागात आधीच वाहतूककोंडीने व अरुंद रस्त्यामुळे नागरीक हैराण झाले असून त्यात पालिका चक्क रस्त्याचाच भाग गिळंकृत करुन पदपथ वाढवत असणाऱ्या कंपनीकडे कानाडोळा करत आहेत असा आरोप स्थानिक माजी लोकप्रतिनिधी यांनी केला आहे.

महापालिकेचा अभियंता विभाग करतोय काय

पालिकेला याबाबत माहिती दिल्यानंतर पालिका अधिकारी चौकशी करुन कार्यवाही करण्याबाबत बाबूगिरीची उत्तरे देऊन तक्रार करणाऱ्यांकडे टाळाटाळ करत होते.परंतु आहे. आता याबाबत २१ तारखेला अतिक्रमणं विभागात सुनावणी होणार आहे.

Story img Loader