नवी मुंबई: शहरात ज्या ज्या ठिकाणी पाळीव श्वानांना फिरवले जाते अशा ठिकाणी मनपाने सुसज्ज ‘पेट कॉर्नर’ तयार केलेले असूनही याबाबत श्वानप्रेमी नागरिक जागरूक नसल्याचे दिसून येते. खूपच कमी श्वानप्रेमी ‘पेट कॉर्नर’चा उपयोग श्वानांच्या नैसर्गिक विधीसाठी करतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरात सुशिक्षित श्वानप्रेमी मोठ्या प्रमाणावर आहेत. या श्वानांवर त्यांचे जिवापाड प्रेम असते. मात्र जेव्हा नैसर्गिक विधीची वेळ येते तेव्हा त्या श्वानांना थेट रस्ता अथवा पदपथावर आणले जाते. याचा सर्वाधिक त्रास पादचाऱ्यांना होतोच. शिवाय शिक्षित लोकांच्या श्वानप्रेमामुळे स्वच्छ सुंदर नवी मुंबईला गालबोट लागते.

मैदान, छोटी उद्याने तसेच निसर्ग उद्यान असल्याने कोपरखैरणे परिसरात सकाळी आणि संध्याकाळी फिरण्यास येऊन व्यायाम करणाऱ्यांची संख्या हजारोंनी आहे. त्यात महिलांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात असतो. मात्र या ठिकाणी श्वानप्रेमींमुळे पदपथ घाणेरडे बनत आहेत. स्वच्छता विभाग रोज साफसफाई करूनही स्वच्छता राहत नसल्याने श्वानांसाठी पेट कॉर्नर बांधण्यात आला आहे. जेणेकरून श्वान प्रेमी त्यांच्या श्वानांना नैसर्गिक विधी त्या ठिकाणी करण्याची सवय लावतील व इतरत्र स्वच्छता राखता येईल.

हेही वाचा… १०७ नव्हे फक्त तीन ते चारच पदाधिकारी गेले शिंदे गटात; ठाकरे गटाचा दावा… आर्थिक लाभातून प्रवेश

मात्र या उपक्रमाला उच्च शिक्षित आणि उच्चभ्रू श्वानप्रेमींचा प्रतिसाद अत्यल्प आहे, अशी प्रतिक्रिया एका सफाई कर्मचाऱ्याने दिली. सकाळी श्वानांना घेऊन फिरण्यास येणाऱ्याश्वानप्रेमींची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने श्वान ज्या ठिकाणी शौच करते त्या ठिकाणी त्याला शौच करू दिले जाते. त्यामुळे पदपथावर ठिकठिकाणी घाण होते. परिणामी नागरिकांना चालणे शक्य होत नाही, श्वानांमुळे पदपथ घाण होतो. पेट कॉर्नरऐवजी मैदानात श्वानांना नेले जाते, अशी खंत अश्विनी पेरणार यांनी व्यक्त केली.

श्वानांनी सार्वजनिक ठिकाणी घाण केली तर दंड आकाराला जातो. याबाबत विभाग कार्यालय कारवाई करत असते. याबाबतच्या सूचना केल्या जातील. मात्र श्वान ज्यांनी पाळले आहेत त्यांनीही शहर सौंदर्यास बाधा येईल, अन्य लोकांना त्रास होईल असे न करता श्वानांना ‘पेट कॉर्नर’ची सवय लावावी, असे आवाहन मनपा करते. – बाबासाहेब राजळे, उपायुक्त, घनकचरा विभाग

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pedestrians suffer due to unsanitary conditions caused by pets even though pet corners are available in navi mumbai dvr
Show comments