एक लाखाचा दंड वसूल; गेल्या नऊ महिन्यांतील कारवाई

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी मुंबईतील खासगी, सहकारी व्यावसायिक संस्थेच्या तसेच मंडईच्या आरिक्षत भूखंडावर पक्षी, प्राण्यांची कत्तल करून मांसविक्री करण्यात येत आहे. अशा अनधिकृत मांस विक्रेत्यांकडून पालिकेने एप्रिल २०१७ ते डिसेंबर २०१७ दरम्यान १ लाख १२ हजार ८८६ रुपयांचा दंड वसूल केला आहे.

नवी मुंबईत परवाना न घेता उघडय़ावर मांसविक्री केली जात आहे. शहरातील परवानधारक मांस विक्रेत्यांची संख्या १०६ आहे, मात्र अनधिकृतपणे मांसव्रिकी करणाऱ्यांची संख्या तिप्पट म्हणजे सुमारे २९८ आहे. सर्वात जास्त ६४ अनधिकृत मांस विक्रेते घणसोलीत आहेत.

नवी मुंबई महानगरपालिकेने अशा विक्रेत्यांवर एप्रिल २०१७ ते डिसेंबर २०१७ या नऊ महिन्यांत ३२ कारवाया केल्या. त्यात ६९ विनापरवाना मांस विक्री केंद्रांवर कारवाई करण्यात आली. त्यात ४३९८ अंडी, १४८४ कोंबडय़ा, २ बकऱ्या जप्त करण्यात आल्या. त्याचबरोबर पिंजरे, ठोकळे, वजनकाटे इत्यादी साहित्य देखील जप्त करण्यात आले.

यांच्या लिलावातून व दंडातून पालिकेने एक लाख १२ हजार ८८६ इतकी दंडात्मक रक्कम वसूल केली.

 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Penalty collection from unauthorized meat sellers in navi mumbai