दोन दुचाकीच्या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीची मदत करणे, महागात पडल्याचा प्रकार समोर आला आहे. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीने त्याच्या मदतीस अन्य मित्राला बोलावले, मात्र तो आला आणि तो येई पर्यंत ज्याने जखमी अपघातग्रस्ताला मदत केली त्याच्यावरच चाकूचे वार केल्याची घटना घडली. या प्रकरणी चाकूचे वार करणाऱ्या युवकावर हत्येचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेही वाचा >>> नवी मुंबई : पब चालवण्यासाठी ४० हजारांचा हफ्ता देण्यास नकार, व्यवस्थापकावर चाकूने हल्ला; पोलीसांनाही…

vitthal polekar murder
पुणे: अपहरणानंतर तासाभरात शासकीय ठेकेदाराचा निर्घृण खून, विठ्ठल पोळेकर खून प्रकरणात तिघे अटकेत; मुख्य सूत्रधार पसार
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
court accepts report filed by eow against shiv sena leader ravindra waikar in Jogeshwari land scam mumbai
रवींद्र वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंद; गुन्हे शाखेने दाखल केलेला अहवाल न्यायालयाने स्वीकारला
Accused who escaped after killing friend arrested
मित्राचा खून करून पसार झालेला आरोपी गजाआड, ससून रुग्णालय परिसरात कारवाई
Attack on police officer on patrol
मुंबई : गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला
bund garden road, attack on youth, Pune,
पुणे : बंडगार्डन रस्त्यावर तरुणाचा खुनाचा प्रयत्न, दोघांविरुद्ध गुन्हा
construction worker dies after gets trapped in jcb machine
जेसीबी यंत्राखाली सापडून बांधकाम मजुराचा मृत्यू
police inspector corruption
प्रकरण मिटवण्यासाठी मागितली साडेचार लाखांची लाच, नया नगरच्या लाचखोर पोलिसाला अटक

अभिषेक सूर्यवंशी हे अपरात्री घणसोली पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून ठाणे बेलापूर मार्गावर गाडी वळवत असताना महापे कडून  ऐरोलीच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीने त्यांना धडक दिली. यात दोघेही आपापल्या दुचाकीवरून खाली पडले. त्यात दुसरा दुचाकी स्वार संदीपकुमार याला जास्त मार लागला. त्याची अवस्था पाहून सूर्यवंशी यांनी त्याला रुग्णालयात पोहचवण्याचा निर्णय घेतला व स्वतःच्या दुचाकीवर बसवून गवळी रुग्णालयाच्या दिशेने निघाले. दरम्यान संदीपकुमार यांनी त्याच्या मित्रांना मदतीस बोलावले.

हेही वाचा >>> नवी मुंबई: अतिरिक्त भाडे आकारणाऱ्या १२ बसवर कारवाई

काही वेळाने त्यांची पत्नी आणि तिचा मानलेला भाऊ शुभम मिश्रा हे आले. मात्र ज्याच्या सोबत अपघात झाला तोच मदत करत आहे हे कळल्यावर शुभम मिश्रा याने सूर्यवंशी याला ठार करण्याची धमकी दिली. त्यामुळे सूर्यवंशी हे दुचाकीवर पळून गेले. त्यांचा पाठलाग जखमी संदीपकुमार यांची पत्नी आणि मिश्रा याने सुरु केला. या पळापळीत गोठीवली गावात शिरताना सूर्यवंशी यांची दुचाकी घसरून ते खाली पडले, तसेच मिश्राचीही दुचाकी पडली. मात्र मिश्रा याने उठून मागेपुढे न पाहता सूर्यवंशी यांच्यावर तीन ते चार वार केले. यावेळी शुभम याचा अन्य मित्र रणजित पांडे तसेच आसपासच्या लोकांनी मिश्रा याच्या तावडीतून सूर्यवंशी याला सोडवले , व गवळी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. या घटनेची दखल  घेत रबाळे पोलिसांनी शुभम मिश्रा यांच्या विरोधात हत्येचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.