केंद्र सरकारने बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेच्या दोन पदाधिकारी आणि काही कार्यकर्त्यांची पनवेल येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. याबाबतची माहिती मिळताच दहशतवाद विरोधी पथकाने संबंधित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अटक केली.

हेही वाचा- मुंबईत बॉम्बस्फोट घडविण्याचे प्रकरण : आझाद मैदान पोलिसांकडून नवी मुंबई पोलिसांकडे गुन्हा वर्ग

केंद्र सरकारने दहशतवादी कारवाया करण्यात येत असल्याचा ठपका ठेवून पीएफआय या संघटनेवर सप्टेंबर २०२२ मध्ये पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे. मात्र, पीएफआयचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची पनवेल येथे बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली. पथकाने पीएफआय संघटनेचे पनवेलचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांविरोधात बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायदा १९६७ चे कलम १० अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. तसेच, याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाने दिली.

हेही वाचा- पोलीस उपायुक्तांना निलंबित करा; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मागणी

मोहम्मद आसिफ युसुफ खान (वय ४२), अब्दुल रहीम याकूब सय्यद (वय ४६), तनवीर हमीद खान (वय ३८) आणि मोईज मतीन पटेल (वय २४) अशी अटक केलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची नावे आहेत. हे चौघेही अनेक वर्षे पनवेलमध्ये राहत असून ते व्यवसाय करणारे आहेत.

Story img Loader