लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

उरण: शाळांच्या सुट्ट्याची चाहूल लागल्याने रविवारी उरणच्या पिरवाडी बीच वरील पर्यटकांच्या गर्दीत वाढ होऊन बीच पर्यटकांनी हाऊसफुल झाला होता. पर्यटकांच्या वाहनांमुळे पिरवाडी परिसरात गर्दी झाली होती. सध्या शनिवारी व रविवारच्या तसेच मुलांच्या उन्हाळी सुट्ट्याना सुरुवात झाली आहे. त्यामुळे ही गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे येथील व्यवसायिकांच्या व्यवसायात ही वाढ झाली आहे.

उरण मध्ये पिरवाडी व केगाव(दांडा)हे दोन बीच आहेत. या बीचवर अनेक आणि स्थानिक नागरीक मोठ्या संख्येने सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी येतात. यात उरणच्या वाढत्या नागरीकरणामुळे वाढ लागली आहे. त्याचप्रमाणे उरणला जोडणाऱ्या रस्त्यावरील प्रवास सुसाट झाला असल्याने नवी मुंबई व उलवे नोड मधील रहिवासी ही येऊ लागले आहेत.

एक दिवसांच्या सुट्टीचे ठिकाण

उरण मधील पिरवाडी समुद्र किनारा प्रसिद्ध आहे. या किनाऱ्यावर मुंबई, नवी मुंबई,पनवेल व पेण आदी तालुक्यातील पर्यटक एका दिवसाच्या सुट्टीसाठी पर्यटक येतात.

हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था

पूर्वी उरण मध्ये बीच परिसरात मर्यादीत हॉटेल होते. त्यामुळे बाहेरील पर्यटकांची संख्या कमी होती. मात्र या परिसरात उत्तम व उच्च दर्जाच्या निवास व खाण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने सलग सुट्टीच्या दिवशी उरणच्या किनाऱ्यावरील पर्यटकांची संख्या वाढली आहे.