उरण : प्रसिद्ध पिरवाडी किनारा ते केगाव असा १.२०० मीटर लांबीचा सागरी मार्ग तयार केला जात आहे. हा मार्ग जून २०२५ पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामुळे उरण मधील पिरवाडी व केगाव हे दोन समुद्र किनारे जोडले जाणार आहेत. तसेच समुद्राच्या महाकाय लाटांमुळे होणारी किनाऱ्याची धूप ही थांबण्यास मदत होणार आहे. याचा फायदा या दोन्ही किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांच्या वाढीस मदत करतील. त्याचप्रमाणे येथील नागरिकांची नित्याच्या कोंडीतून सुटका होणार आहे.

हा सागरी मार्ग व्हावा यासाठी ग्रामपंचायतीने मागणी केली होती. त्यानुसार मेरिटाईम बोर्डाकडून याची उभारणी केली जात आहे. पिरवाडी व केगाव हे दोन समुद्र किनारे उरण मध्ये आहेत. यातील केगाव किनारा अनेकांना माहीत नाही. मात्र या सागरी मार्गामुळे केगाव किनाऱ्यावरील पर्यटकांच्या संख्येत ही वाढ होण्याची शक्यता आहे. हा मार्ग दोन टप्प्यात तयार करण्यात येणार आहे. यात पहिल्या टप्प्यात ५५० मीटर ते तर दुसऱ्या टप्प्यात ६५० मीटर लांबीचा असेल यासाठी एकूण १० कोटी ५० लाख रुपये खर्च येणार आहे.

water pipe bursts in Dombivli
डोंबिवलीत काँक्रीट रस्ते काम करताना जलवाहिनी फुटली;  पी. पी. चेंबर्सजवळ शेकडो लीटर पाणी वाया
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
land acquisition for ring road
रिंग रोडसाठी २०० हेक्टर भूसंपादन बाकी; ५०० कोटींच्या निधीची रस्ते विकास महामंडळाकडे मागणी
Local fishermen save life of couple stuck in rough sea in ratnagiri
दाम्पत्याला भाट्ये समुद्रात खेळणे पडले महागात; स्थानिक मच्छीमारांनी वाचविले प्राण
problem of potholes on Khopta bridge to Koproli road will cleared soon
खोपटे पूल ते कोप्रोली मार्ग लवकरच खड्डेमुक्त, एक किलोमीटर रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी सात कोटींच्या निधीस मंजुरी
road along Seawoods creek flamingo habitat was recommended for closure
फ्लेमिंगोंच्या अधिवासात रस्ता नको, राज्य सरकारच्या पाहणी पथकाच्या अहवालात खाडीकिनारचा रस्ता बंद करण्याची शिफारस
Cyclone Feingal cleared entire state and once again state is heading towards winter
विदर्भ गारठला… गोंदिया ९.४, तर नागपूर, वर्धा १० अंश सेल्सिअस
Kandalwan damage new jetty, Virar Marambalpada,
नवीन जेट्टीच्या रस्त्यासाठी तिवरांची कत्तल? विरारच्या मारंबळपाडा परिसरातील प्रकार; पर्यावरणप्रेमींकडून संताप

हेही वाचा >>>रविवार आरोग्य सफरीचा पाम बीच मार्ग, दर रविवारी क्रीडाप्रेमींसाठी खुला करण्याचा आयुक्तांचा प्रस्ताव

पिरवाडी ते केगाव या सागरी किनारा मार्गामुळे या किनाऱ्याची समुद्राच्या महाकाय लाटापासून संवर्धन होऊन धूप थांबविण्यास ही मदत होणार आहे. त्यामुळे हा मार्ग महत्वाचा ठरणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नागाव व केगाव मधील समुद्र किनाऱ्याची लाटांमुळे धूप होत आहे. परिणामी येथील भात शेती व इतर पिकांना याचा फटका बसत आहे. समुद्रकिनारी असलेल्या भात शेतीत समुद्राचे खारे पाणी शिरून येथील भात शेती नापिकी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच येथील गोड्या पाण्याच्या विहिरी च्या पाण्यावर ही परिणाम जाणवू लागला आहे. या मार्गामुळे बंधारा मजबूत होऊन नागाव व केगाव मधील शेती आणि पाण्याचे संवर्धन होण्यासही मदत होणार आहे.

वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत

सध्या केगाव आणि परिसरात जाण्यासाठी उरण शहरातून जावे लागत आहे. त्यामुळे येथील प्रवासी,वाहनचालक आणि नागरिकांना अनेकदा शहरातील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. मात्र हा सागरी मार्ग पूर्ण झाल्यानंतर उरणच्या चारफाटा ते नागाव मार्गे थेट केगाव पर्यंत विना वाहतूक कोंडी प्रवास करता येणार आहे. त्यामुळे या मार्गामुळे येथील नागरिकांना फायदा होणार आहे.

Story img Loader