नवी मुंबई : जी २० परिषद यशस्वीपणे पार पडली असून यामुळे युरोप व अन्य ठिकाणच्या निर्यात व्यापाराला मोठी चालना मिळेल. जागतिक बाजारपेठेत मसाला निर्यातीत भारताला जुने वैभव प्राप्त होईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केला.
नवी मुंबईतील वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित ‘वर्ल्ड स्पाईस काँग्रेसच्या’ १४ व्या आवृत्ती समारोहाला केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी हजेरी लावली होती. यावेळी व्यवसायिकांना स्पाइसेस एक्सलन्स अवॉर्ड्स प्रदान करण्यात आले. वर्ल्ड स्पाईस काँग्रेस मसाला क्षेत्रातील सर्वात मोठा कार्यक्रम असून जागतिक मसाला उद्योगातील सर्व प्रमुख भागधारक या कार्यक्रमाला उपास्थित होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून खरेदीदार आणि विक्रेत्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी जागतिक बाजारपेठेत भारत पुढील पाच वर्षांत १० बिलीयन डॉलरच्या निर्यातीचे लक्ष ठेऊन काम करेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
मसाला उद्योग वाढवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत असून उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. याशिवाय निर्यातीला प्रोत्साहन दिले जात असल्याने त्याचा मोठा लाभ उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे, असेही गोयल यांनी सांगितले.