नवी मुंबई : सीवूड्स विभागात सेक्टर ४६ येथील सोसायटीमधील इमारत क्रमांक ७ च्या टाकीखालील टेरेसचा भाग मोठ्या प्रमाणात कोसळला. त्यामुळे सोसायटीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून विभागात पालिकेकडे नव्याने सुरु असलेल्या बांधकाम व्यावसायिक खोदकाम करत असून सातत्याने होणाऱ्या मोठ्या प्रमाणातील ब्लास्टिंगमुळेच असा प्रकार घडत असून पालिका आयुक्त व संबंधित विभागांना पत्रव्यवहार करूनही काहीही उपयोग होत नसल्याची खंत स्थानिक नागरिकांनी केली आहे. त्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोणाला धरायचे असा सवाल उपस्थित केला जात आहे.

शहरात पुनर्विकासाचे प्रकल्प वेगाने सुरु असताना दुसरीकडे सीवूड्स सेक्टर ४६ परिसरात विविध बांधकाम व्यावसायिकांचे गृहप्रकल्प सुरु आहेत. पामबीच मार्गालगत असणाऱ्या या टोलेजंग प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम केले जाते. त्यामुळे या भागात सातत्याने धुळीचे साम्राज्य पाहायला मिळते. तर सातत्याने होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे रहिवाशांमध्ये सातत्याने भूकंपाचे धक्के होतायत की काय असा भास होत आहे. त्यामुळे या परिसरातील विविध सोसायट्यांचे नागरीक सातत्याने होणारे ध्वनी व वायू प्रदूषण तसेच रस्त्यावरुन होणारी अवजड वाहनांची वाहतूक यामुळे त्रस्त झाले आहेत.

dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त

हेही वाचा – साताऱ्यात उदयनराजे यांना महायुतीतूनच विरोध

मुळातच या प्रकल्पांच्या शेजारी सिडकोनिर्मित सोसायट्या आहेत. याच सोसायट्या धोकादायक स्थितीत असून सातत्याने होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे सिडकोकालिन इमारती पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळून दुर्घटना घडल्यास कोणाला जाब विचारायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या परीक्षांचा कालावधी सुरु असून विद्यार्थ्यांना अभ्यासातही सततच्या आवाजाचा त्रास होत असल्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांचे ‘धनुष्य’ गणेश नाईकांच्या खांद्यावर? ठाण्याच्या जागेसाठी मनोमिलन?

सीवूड्स विभागात विविध ठिकाणी नवीन टोलेजंग इमारती उभारणीची कामे सुरु आहेत. या कामासाठी होणारी खोदकामे तसेच ब्लास्टींग यामुळे नागरिकांच्या मनात भिती आहे. सुरुंगाचे स्फोट घडवले जातात तसे हादरे बसतात. त्यामुळे या विभागातील नागरिक भीतीच्या वातावरणात जगत आहेत. काही दुर्घटना घडल्यास कोणाला जबाबदार धरायचे? – प्रभाकर स्वामी, स्थानिक रहिवासी

हेही वाचा – मिरजेतील उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यावर काँग्रेसचा बहिष्कार

आमच्या सोसायटीतील ७ क्रमांकाच्या इमारतीवरील पाण्याच्या टाकीचा प्लास्टरचा भाग मंगळवारी दुपारी कोसळला. त्यामुळे सर्वच सोसायटींमध्ये भीतीचे वातावरण आहे. सोसायटीशेजारी सुरु असलेल्या टोलेजंग इमारतीच्या निर्मितीसाठी ब्लास्टिंग केले जात आहे. याबाबत तक्रार करुनही पालिका, सिडको दुर्लक्ष करत आहे. – सुहास पाटील, श्री साईकृपा सोसायटी सदस्य