महामुंबईत सिडकोने शाळांना दिलेले खेळाच्या मैदानांसाठीचे भूखंड शाळांनी फुटबॉल टर्फच्या मैदाना मध्ये रुपांतर केली आहेत. याबाबत सिडकोने जानेवारीमध्ये शहरातील १० खासगी शाळांना नोटीस पाठवून १५ दिवसात बेकायदा फुटबॉल टर्फ हटवण्याचे आदेश दिलेत.त्याला ४ महिने उलटलून गेले असून सिडको अधिकारी कारवाईचा बडगा उभारत नाहीत. त्यामुळे सिडको अधिकारी  कागदावरच्या कारवाईपुरतेच उरलेत का अशी चर्चा केली जात  आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> नवी मुंबईत अतिरिक्त पाणी वापर करणाऱ्या ३३६ सोसायट्यांना पालिकेच्या नोटीसा

शहरातील अनेक मूळ गावांसाठी हक्काची खेळाची मैदाने नाहीत. सिडकोने शहरात खासगी शाळांना करारनामे करुन दिलेली मैदाने ही शाळेच्या वेळाव्यतिरिक्त  व सुट्टीच्या दिवशी स्थानिक नागरीकांना खेळण्यासाठी  खुली ठेवण्याची अट असतानादेखील अनेक शाळांनी मैदाने कुलुपबंद करुन ठेवली असून याच मैदानावर  फुटबॉल टर्फ उभारुन व्यावसायिक वापर सुरु केला आहे. शाळांना १८ जानेवारीला नोटीस पाठवली असून सिडकोने दिलेल्या अटी शर्थींचे पालन करण्याची १५ दिवसांची मुदत दिली होती अन्यथा सिडकोने कारवाई करण्याचा इशारा दिला होता.परंतू दुसरीकडे शाळांनी केलेले अतिक्रमण ४ महिन्यानंतरही हटवले  जात नसून शाळांची मुजोरी सुरु आहे सिडकोही कारवाईकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सिडको अधिकारी फक्त कागदावरच्या कारवाईपुरतेच आहेत का असा प्रश्न विचारला जात आहे.

सिडकोही कारवाईकडे दुर्लक्ष करत आहे. सिडकोने कारवाई न केल्याने खेळाडूंना खेळायला मैदाने नाहीत. शाळांना उन्हाळ्याची सुट्टी आहे.परंतू या शाळांची मैदाने मात्र कुलूपबंद करुन ठेवली आहे.

हेही वाचा >>> नवी मुंबई : पावणेतील आदिवासी पाड्यात पाण्यासाठी नागरिकांची वणवण

नवी मुंबई शहरात शाळांना सिडकोने भूखंड दिले असून शाळेशेजारी अनेक शाळांना एक ते दोन एकर चेभूखंड करारनामा करुन दिले आहेत.नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत तसेच शाळा तेथे मैदान हवे व शाळेच्या वेळा व्यतिरिक्त मैदान सर्वसामान्य स्थानिकांना खेळासाठी उपयोगी येतील यासाठी सिडकोने ही मैदाने खाजगी संस्थेला करारनामे करुन दिली आहेत. फुटबॉल टर्फ तदुसऱ्या संस्थांना भाडेतत्वावर देऊन या सार्वजनिक मैदानांचा आर्थिक फायद्यासाठी गैरवापर सुरु असल्याचे चित्र आहे.  नवी मुंबईतील अनेक शैक्षणिक संस्थांनी ही मैदाने बंदीस्त करुन टाकली आहे. हे मैदान शाळेच्या वेळाव्यतिरिक्त व सुट्टीच्या दिवशी स्थानिकांना खेळासाठी उपलब्ध राहतील असा कोणताही फलक  शाळांनी किंवा सिडकोनेही लावला नाही. हेच फुटबॉल टर्फ हे शाळेतील व शाळेबाहेरील विद्यार्थ्यांना तसेच कार्पोरेट कंपन्यांना भाड्याने तासाला प्रति खेळाडू २०० ते ५०० रुपये प्रमाणे भाड्याने दिली असल्याची चर्चा आहे.

सिडको अधिकाऱ्यांनो तुमच्या अधिकाराचा वापर कधी करणार ?

नवी मुंबईतील अनेक शाळांना सिडकोने नोटीस पाठवून १५ दिवसाची मुदत  दिली होती. त्याला ४ महिने झाले. त्यादरम्यान काही शाळांचे नव्याने फुटबॉल टर्फ तयार झाले.  सिडकोचा हा  कोणता  कारभार आहे? या फुटबॉल मैदानावर  तात्काळ कारवाई झाली पाहीजे.

सुधीर दाणी, प्रवर्तक अलर्ट सिटीझन्स फोरम ,नवी मुंबई

सिडकोने शाळांना १५ दिवसात टर्फ हटवण्याचे लेखी आदेश दिले होते.परंतू अद्याप कारवाई करण्यात आली नाही.बहुतांश खासगी शाळांची मैदाने कुलूपबंद असून भाड्याने खासगी संस्थांना उन्हाळ्याच्या सुट्टीच्या कालावधीत दिली आहेत. सिडको अधिकाऱ्यांनी  कारवाई करावी.

समीर बागवान ,उद्धव बाळासाहेब ठाकरे गट

चौकट- सिडकोने शाळांनी बेकायदा फुटबॉल टर्फ बनवण्यात आल्याबाबत  नोटीस बजावल्या आहेत. तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना सिडकोच्या संबंधित विभागाला दिलेल्या आहेत.कैलास शिंदे, सह व्यवस्थापकीय संचालक ,सिडको

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Plots given for playgrounds to schools by cidco converted into football turf fields zws