प्राणी आणि माणसांमध्ये नाते निर्माण करण्यात मिथके, पुराणे यांनी मोठी भूमिका बजावली आहे. प्रत्येक देवाबरोबर वाहन म्हणून एकेक प्राणी किंवा पक्षी देण्यात आला आहे. यातील मोर, गरुड, वाघ पाळीव नाहीत. दचकू नका.. गणपतीचे वाहन उंदीर का.. वगैरे अशी कोणतीही गोष्ट इथे वाचायला मिळणार नाही; पण तरीही विषय उंदराचाच आहे. उंदीर आणि त्याचे परदेशी भाईबंध आता पाळीव वर्गातला महत्त्वाचा घटक झाला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
रात्री घरात होणारी खुडबुड आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी घरातल्या सामानाची हलवाहलव करून काठी, बॅट, चिमटे यांसह सशस्त्र शोधमोहीम.. ही बहुतेकांची उंदीर या प्राण्याबरोबर जोडलेली आठवण असेल. मात्र काही काळापूर्वी बहुतेक प्रत्येक घराने एकदा तरी अनुभवलेला हा प्रसंग आता आठवणीतच राहणारा आहे. घरोघरी उपद्रव देणारा उंदीर लाडोबा होऊन अनेक घरांचा भाग झाला आहे. फरक इतकाच की, हे पाळीव उंदीर पांढरे असतात.
पांढरे उंदीर, त्यांचेच परदेशी भाईबंध हॅमस्टर्स, फेरेट्स, जर्बिल्स आणि हे प्राणी पाळण्यासाठीही प्राणिप्रेमी सरसावले आहेत. रोडन्ट्स म्हणजे कृंतक वंशातील हे सगळे प्राणी, म्हणजे कुरतडणारे प्राणी. यातील उंदीर हा आपल्या फार पूर्वीपासून ओळखीचा. अगदी ऐंशीच्या दशकापासून एखाद्या घरात पांढरे शुभ्र, माणकांसारखे लाल डोळे, गुलाबी कान आणि नाक असे गोजिरवाणे दिसणारे उंदीर पिंजऱ्यात टाकलेल्या खाण्यावर ताव मारताना दिसायचे. उंदराबाबत आपल्याकडे आता दोन टोकांच्या भूमिका झाल्या आहेत. ते उपद्रवी प्राणी (पेस्ट) म्हणूनही गणले जातात आणि त्याच वेळी ते पाळीव म्हणूनही आता गृहीत धरण्यात येत आहेत. या वंशावळीतील नसला तरीही छोटय़ा पाळीव प्राण्यांच्या गटात मोडणारे पांढरे ससेदेखील खूप पूर्वीपासून पाळीव आहेत.
‘पॉकेट पेट्स’चा ट्रेंड
जगात ‘पॉकेट पेट्स’ म्हणून या छोटय़ा प्राण्यांचे वेड पसरले आहे. पार्टीला असे पॉकेट पेट्स पर्समध्ये ठेवून फिरणे हा फॅशन सिम्बॉलदेखील आहे. उंदीर आणि ससे यांची भारतीय पाळीव जगताशी जुनी ओळख आहे. मात्र आता हॅम्स्टर्स, गिनी पिग्स या नव्या प्रजातींनी भारतीय ‘पेट इन्डस्ट्री’मध्ये शिरकाव केला आहे. फेरेट्स, जर्बिल्सदेखील भारतीय बाजारपेठेत मिळू लागले असले तरीही अजून त्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. हॅम्स्टर्सच्या साधारण २२ प्रजाती आहेत. वेगवेगळ्या देशांत त्या मिळतात. मात्र यातील सिरियन हॅमस्टर्स आणि युरोयिन हॅम्स्टर्सना पाळीव म्हणून जगभरातून पसंती मिळाली आहे. भारतात सिरियन हॅमस्टर्स आता पाळीव प्राण्यांचे साहित्य विकणाऱ्या दुकानातही मिळू लागले आहेत. त्याच्या रंगावरून ‘गोल्डन हॅमस्टर्स, फॅन्सी हॅमस्टर्स, टेडीबेअर हॅमस्टर्स आणि स्टॅडर्ड हॅमस्टर्स’ असे चार प्रकार प्रचलित झाले आहेत. गोंडस दिसणे हे या प्राण्यांचे बलस्थान. गिनी पिग्जच्या रंगावरूनही फॅन्सी, गोल्डन असे प्रकार मिळतात. या प्राण्यांची ऑनलाइन बाजारपेठही तेजीत आहे.
स्वस्त आणि मस्त
कुत्रा किंवा मांजराप्रमाणे आवाज नाही. तुलनेने खाणे कमी, फिरवायला नेणे, आंघोळ घालणे यांपासून सुट्टी, तुलनेने कमी वेळ द्यावा लागतो आणि किंमतही कमी, त्यामुळे या प्राण्यांना अधिक पसंती मिळू लागली आहे. साधारण ५०० ते दीड हजार रुपयांपर्यंत हॅमस्टर्स आणि ससे मिळू शकतात. पांढरे उंदीर अगदी अडीचशे रुपये जोडी इतक्या कमी किमतीतही मिळतात. या प्राण्याबरोबरच त्यांचे खाणे, खेळणी आणि अद्ययावत पिंजरेदेखील आलेच. प्राण्यांना खेळता येईल, त्यांना आवश्यक तेवढा व्यायाम मिळेल असे आकर्षक पिंजरे पशुसाहित्याच्या दुकानात मिळतात. या प्राण्यांची आणि त्यांच्या पिंजऱ्यांची स्वच्छता मात्र निगुतीने ठेवावी लागते. त्याचप्रमाणे औषधोपचार हेदेखील अजून आव्हानच म्हणावे लागेल. भारतात पशुवैद्य मोठय़ा प्रमाणावर असले तरीही या छोटय़ा प्राण्यांवर उपचार करणारी क्लिनिक्स अजूनही सहज सापडत नाहीत. फॅशन म्हणून किंवा पॅशन म्हणून पण उंदीर वर्गातल्या या प्राण्यांशी माणसाचे आता नव्याने नाते तयार झाले आहे.