शेखर हंप्रस
फुटपाथवर सर्रास विक्री; ‘मेटल पॉइझनिंग’चा धोका
ऑक्टोबर हीटमुळे शीतपेयांना मागणी वाढली असून उसाच्या गुऱ्हाळापासून लिंबू सरबत, बर्फाचे गोळे विक्रेते रस्तोरस्ती दिसत आहेत. पण, बर्फ घातलेले पेय पिताय, सावधान! यासाठी लागणारा बर्फ कुठलेही सुरक्षेचे नियम न पाळता बिनदिक्कत फुटपाथवर विकला जात आहे. त्यामुळे दूषित पाण्याने जे रोग होतात, ते होऊ शकतात व आरोग्य बिघडू शकते.
शहरातील नागरिकांच्या आरोग्याविषयी आरोग्य विभाग तसेच अन्न आणि औषध प्रशासन काळजी घेत असला तरी रस्त्यावर विकला जाणारा बर्फ याकडे मात्र कुणाचेही लक्ष दिसत नाही.
आपण शहरात कामानिमित्त फिरत असताना अनेकदा फुटपाथवर बर्फ ठेवून त्यावर बारदान (पोते) झाकून ठेवलेले दृश्य पाहतो. पण हाच बर्फ आपण वेगवेगळ्या सरबत व पदार्थामध्ये सेवन करीत असतो. मात्र, या बर्फाचा दर्जा तपासाला जात नाही. पदार्थाचा दर्जा तपासण्याचे काम आमचे नाही म्हणून आरोग्य विभाग हात झटकतो तर बर्फ घन की द्रव याची निश्चित व्याख्या अन्न व औषध प्रशासनाच्या कायद्यात नसल्याने तेही टाळतात. विशेष म्हणजे अशा पद्धतीने फुटपाथवर बर्फाच्या लाद्या ठेवल्याप्रकरणी मनपाचा अतिक्रमण विभागही कारवाई करीत नाही.
उसाचे रस विक्रेते, विविध रंग टाकून आकर्षक बर्फ गोळा विकणारे, फळांचा रस विकणारे ज्यूस सेंटर, उन्हाळ्यात जागोजागी माठ घेऊन लस्सी आणि ताक विकणारे हा बर्फ घेत असतात. त्याशिवाय काही उपाहारगृहांमध्येही बर्फाचे वितरण केले जाते. या शिवाय मोठय़ा हॉटेल्समधील ज्यूसमध्येही हाच बर्फ असतो. बारमध्येही बर्फ वापरला जातो.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, दूषित पाण्याने जे रोग होतात, तेच रोग उघडय़ावरील बर्फ खाल्ल्याने होतात. हा बर्फ बाहेरील पेयात वापरला जात असल्याने आरोग्याची कितीही काळजी घेतली तरी लाभ होत नाही. याशिवाय विषमज्वर, कॉलरा, अन्नातून विषबाधा, मेटल पॉइझनिंग, अमेबिया, उलटय़ा, कावीळ, अतिसार, हगवण असे आजार होऊ शकतात. याशिवाय पोलिओसारख्या रोगाचे विषाणूसाठी बर्फ माहेरघरच असते.
सायकलवर विक्री
औद्योगिक वसाहतीत बर्फाचे अनेक कारखाने आहेत. या कारखान्यातून शहरात ठिकठिकाणी मिनी डोअर गाडीने बर्फाच्या लाद्या भल्या पहाटे उतरवल्या जातात. त्यानंतर सकाळपासून मुले सायकलवर हा बर्फ गिऱ्हाईकांना पोहच करतात. आइस क्युब ८ रुपये किलो तर बर्फ ५ रुपये किलोने विकला जातो. हाच बर्फ कारखान्यातून आणावयाचा असेल तर वेळ, पैसा आणि वाहतुकीचा खर्च होत असल्याने अशा वितरकाकडूनच बर्फ घेतला जातो.
या बर्फाच्या सेवनामुळे मेटल पॉइझनिंगचा धोका जास्त असतो. त्यामुळे हाडे ठिसूळ होणे आणि दातांच्या समस्या मोठय़ा प्रमाणावर उद्भवतात. त्यामुळे असा बर्फ किंवा त्यापासून बनविलेली पेये टाळावीत.
-डॉ.अनिरुद्ध कुलकर्णी