नवी मुंबईत अंगावर घाण टाकून नागरिकांचे लक्ष विचलित करून त्यांना लुटणाऱ्या चौकडींपैकी मायलेकाला एपीएमसी पोलिसांनी जेरबंद केले आहे. ते अंबरनाथ येथील रहिवासी असून चौडाम्मा मारप्पा बोई व उलगप्पा मारप्पा बोई असे या मायलेकाचे नाव आहे. एपीएमसी परिसरात विशेषत: बँकेच्या किंवा एटीएमच्या आसपास ही चौकडी बँकेतून व एटीएममध्ये पैसे काढणाऱ्या व्यक्तींवर पाळत ठेवत. ती व्यक्ती पैसे घेऊन बाहेर आल्यानंतर त्या व्यक्तीच्या अंगावर भिजवलेल्या बिस्किटांची पेस्ट किंवा खाजखुजली टाकायचे. ती व्यक्ती घाण किंवा विष्ठा समजून हातातील बॅग खाली ठेवून ती झटकत असताना या चौकडींपैकी एक जण बॅग घेऊन पसार होत असे. याबाबत एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी मसाला मार्केटजवळ सापळा लावला. पोलीस पथकास तेथे फिरणाऱ्या तीन पुरुष व एका महिलेवर संशय आला. त्यांना हटकले असता पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या चारजणांच्या या टोळीतील दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा