नवी मुंबई : : उरण जेएनपीटी परिसरात आढळून येणारे मद्य विक्रेते फेरीवाले हा प्रकार नवीन राहिला नाही मात्र नेरुळ सारख्या परिसरात हि फेरीवाल्या प्रमाणे विविध कंपनीचे मद्य विकणारे आढळून येत आहेत. अशाच एका फेरीवाल्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या कडून साडे सात हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. हे विक्रेते बार वाईन शॉप बंद झाल्यावर शहरातील काही ठराविक ठिकाणी पिशवीत मद्याच्या बाटल्या अधिक दाम घेऊन विकत असल्याचे निदर्शनास आले आहे.
हेही वाचा >>> जेएनपीटी साडेबारा टक्के भूखंड आरक्षणाचा दसऱ्याचा मुहूर्त सरला; आता भूखंड निश्चिती आणि नामफलकाची प्रकल्पग्रस्तांना प्रतिक्षा
मंगळवारी अपरात्री डिडच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन ढगे, व अन्य पथक रात्री बाराच्या सुमारास प्रतिबंधक गस्त करीत असताना सेक्टर २० नेरुळ रेल्वे स्टेशन परीसरात गस्त घालत असताना सहाय्य्क पोलीस निरीक्षक ढगे यांना राजहंस पान शॉपच्या बाजुला फुटपाथवर नेरूळ रेल्वे स्टेशन (पश्चिम), नवी मुंबई येथे सिदधीलिगअप्पा नावाचा इसम हा उघडयावर हस्ते पर हस्ते विनापरवाना देशी विदेशी दारू विक्री करीत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्वरित ढगे यांनी दोन पंचांना बोलावून पोलीस व पंच असे राजहंस पान शॉपच्या बाजुला फुटपाथवर नेरुळ रेल्वे स्टेशन पश्चिम एक इसम हा त्याचे जवळील काळया रंगाच्या कापडी पिशवी मध्ये काहीतरी घेवुन उभा असल्याचे दिसला. त्याचा दारूविक्रीचे कामी संशय आल्याणे त्यास जागीच ताब्यात घेतले . व त्याच्या कडील पिशवीची झडती घेतली असता त्यात देशी विदेशी मद्याच्या ६२ बाटल्या आढळून आल्या. त्या सर्व जप्त करण्यात आल्या आहेत. बार वाईन शॉप बंद झाल्यावर शहरात काही ठराविक ठिकाणी जसे पानटपरी शेजारी , चायनीज सेंटर, पदपथावर मांसाहारी पदार्थ बनवून विकणाऱ्या फेरीवाल्या जवळ अशी माणसे पिशवी घेऊन उभी असतात. मद्यपी अशा लोकांना आणि ज्याला मद्य हवे अशा लोकांना असे दोन्ही एकमेकांना बरोबर ओळखतात. काही विशिष्ट खाणाखुणा होताच कुठले मद्य हवे अशी विचारणा केली जाते व जे पहिले ते मद्य दीडपट दुप्पट किमतीत विकले जाते. अशी माहिती एका पोलीस कर्मचाऱ्याने दिली.