महामार्गावर दरोडे घालणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात नवी मुंबई गुन्हे शाखेला यश आले असून दिलशाद मुमताज, मुकीम खान, रकीब शेख, फुरकान खान, विनोद उपाध्याय, कासीम रिझवी अशी या आरोपींची नावे आहेत.
भिंवडीहून लोंखडी सळयांचा ट्रेलर घेऊन तळोजा येथे निघालेल्या अन्सारीकडे गुरुवारी रात्री साडेबाराच्या दरम्यान नाशिक भिंवडी बायपास मार्गावर सहा जणांनी लिफ्ट मागितली. त्यापैकी तीन जण ट्रेलरमध्ये चढले व तीन जण ट्रेलरच्या पुढे स्विफ्ट गाडीतून जाऊ लागले. पहाटे साडेचार वाजता हा ट्रेलर नावडा फाटा येथे आल्यानंतर पुढील स्विफ्ट गाडीने ट्रेलर थांबवला व चालकाला मारहाण करून खाली ढकलून दिले. त्याला जिवे मारण्याची धमकी देत त्याच्याकडून १३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून ट्रेलर पळवून नेला. या संदर्भात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा ट्रेलर व त्यातील माल विकण्यासाठी काही संशयितांची टोळी नवी मुंबई येथील खारघर परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली. पोलिसांनी या आरोपींकडून १५ लाख रुपये किमतीचा ट्रेलर व ७ लाख रुपयांचा माल हस्तगत केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police arrested for robbery gang
Show comments