पोलिसांच्या घरांची समस्या मोठी असल्याने आगामी काळात पनवेलनजीक १२० एकर जागेवर दहा हजार घरांचा सर्वात मोठा गृहप्रकल्प साकारला जाणार आहे. अल्पदरात ९०० चौरस फुटांची ही घरे असतील, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रताप दिघावकर यांनी राष्ट्रीय खान्देश संस्थेच्या मेळाव्यात दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वाशी येथे खान्देश मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी खान्देशातून नवी मुंबई परिसरात येत स्व:कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.  या वेळी मान्यवरांनी चौफेर टोलेबाजी केली. पिस्तोल दिसलं तर काय करणार, पण आता मी घाबरतो असे सांगत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणाले, लग्नामुळे माणूस कर्जबाजारी होत आहे. याबाबत जागृती घडली पाहिजे. सामूहिक विवाह संकल्पना राबवली पाहिजे. खान्देश संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन केले.

कार्यक्रमात उद्योजक प्रकाश बाविस्कर, नगरसेवक संजू वाडे, शिवसेना उपनेते विजय नाहाटा, माजी विधान परिषद आमदार नरेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

खान्देश भवनसाठी सिडकोकडे पाठपुरावा

या वेळी नवी मुंबईत खान्देश भवन, वृद्धाश्रम व वैद्यकीय सुविधांची आयोजकांनी मागणी केली. यावर महाजन यांनी सिडको स्तरावर खान्देश भवनसाठी भूखंड आणि आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.