नवी मुंबई महानगर पालिकेचे क्षेत्र आता वाढणार असून त्यात चौदा गावांचा समावेश करण्याची प्राथमिक अधिसूचना काढण्यात आली आहे. त्यामुळे आता नवी मुंबई पोलीस आयुक्तालय वाढही होण्याची चिन्ह आहेत १४ गावांच्या समावेशाने आयुक्तालय क्षेत्र वाढीची अनेक दिवसापासून धूळ खात पडलेल्या फायली उघडल्या जातील अशी शक्यता निर्माण झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दहिसर, मोकाशी, वालीवली, पिंपरी, निघू, नावाली, वाकलण, बमारली नारीवली, बाले, नागांव, भंडार्ली, उत्तरशिव, गोटेघर या १४ गावांचा समावेश राज्य शासनाने १९९४ मध्ये नवी मुंबई केला होता. मात्र पोलीस हद्द कल्याण आयुक्तालयाची होती. नवी मुंबई मनपात या गावांचा समावेश केल्याने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने या गावांचाही समवेश नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात करावा अशी मागणी केली होती. मात्र सदर गावातील ग्रामस्तांनी अनेक आंदोलने केली व निवडून आलेल्या नगरसेवकांनी राजीनामे दिले असे अनेक राजकीय नाट्याचे प्रयोग झाले. त्यामुळे या गावांना नवी मुंबई मनपा क्षेत्रातून वगळण्यात आले आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची हद्द खुंटली.

हेही वाचा : उरण : करंजा ते रेवस रो-रो सेवेची प्रतिक्षा कायम ; रेवस जेट्टी रखडल्याने प्रतिक्षा

याच वेळी खोपोली पर्यतच्या हद्दीचा मुद्दा हि फायलीत बंद झाला.आता मात्र या चौदा गावांचा समावेश नवी मुंबई मनपात झाल्याने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात हद्द वाढ हालचाली सुरु झाल्याचे बोलले जाते. या १४ गावांच्या लगत नवी मुंबई आणि ठाणे बेलापूर औद्योगिक नागरी असल्याने येथील जमिनींना सोन्याचे भाव आले आहेत त्यातच बेकायदा बांधकामांना जोर आला असून भूमाफियाचा धुमाकूळ वाढला आहे. अशात अज्ञाना पोटी अनेक व्यवहार हे आतबट्ट्याचा ठरत होते. अशात विकास हि खुंटला गेला. आणि गुन्हेगारीत वाढ झाली. खोपोली सह भौगोलिक दृश्या या गावांचा समावेश नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात करणे उचित आहे तशी मागणीही फार पूर्वी करण्यात आली नंतर मात्र मागणी मागे पडली मात्र आता पुन्हा मागणी होऊ शकते अशी माहिती एका जाणकार अधिकार्याने दिली. – बिपिनकुमार सिंग (पोलीस आयुक्त नवी मुंबई) : या बाबत पूर्ण माहिती मला नाही या बाबत पूर्ण माहिती घेत जुन्या फाईल्स तपासून योग्य तो निर्णय घेतला जाईल

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police commissionerate area increase after municipal corporation in navi mumbai news tmb 01