पनवेल : तळोजा औद्योगिक वसाहतीलगतच्या पेणधर गावातील बीअर शॉपीमध्ये मद्याच्या बाटल्या विकणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. पेणधर गावातील आरुषी बीअर शॉपीमध्ये गुरुवारी दुपारी साडेचार वाजता सुमारे ९ हजार रुपयांची विस्कीच्या बाटल्या विक्री करताना तळोजा पोलिसांनी ही कारवाई केली. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी मुंबईत सर्वत्र निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यामुळे पोलीसांनी ऑलआऊट ऑपरेशन हाती घेतले असून प्रत्येक पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना रात्रपाळी व दिवसपाळीत बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांना पकडून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची सूचना पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली आहे.

हेही वाचा…पनवेलमध्ये तरुणाकडून एक किलो गांजा जप्त

यामुळे सर्वच पोलीस ठाण्यात रस्त्यावर उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांपासून ते जुगार खेळणारे, स्वतःजवळ सूरा व तलवारी बाळगणारे तसेच विना परवानगी देशी व विदेशी दारु विक्री करणारे, अंमलीपदार्थाचे सेवन आणि विक्री करणाऱ्या संशयितांची धरपकड पोलीस करत आहेत. याच मोहीमेमध्ये पेणधर गावात आरुषी बीअर शॉपीमध्ये ४० वर्षीय रवी लालवाणी बीअरच्या बाटल्यांसोबत विस्कीच्या बाटल्यांमधून मद्य विक्री करत असताना तळोजा पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police crackdown on illegal liquor sales in taloja midc near pendhar village psg