लोकसत्ता टीम
उरण : उदघाटनाच्या वेळी स्थानिक गावांची नावे स्थानकांना न दिल्याने आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या विरोधाच्या पार्श्वभूमीवर रांजणपाडा स्थानकात पोलिसांची प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
येथे रांजणपाडा ऐवजी स्थानिक धुतुम गावाचे स्थानकाला नाव देण्याची मागणी करण्यात आली आहे. उरण – खारकोपर रेल्वे मार्गावरील स्थानकांना गावांची नावे देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मात्र हा प्रस्ताव गुलदस्त्यात आहे.
आणखी वाचा-“साहेब आम्हालाही मोदींच्या सभेला यायचे आहे”, नवी मुंबईतील स्थानिकांची भाजप नेत्यांना विनंती
रांजणपाडा ऐवजी रंजनपाडा फलक
रेल्वेने रांजणपाडा स्थानकाला रांजणपाडा ऐवजी रंजनपाडा असाही फलक लावला आहे.