नवी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी संदेश द्वारे चुकीचे आणि दोन समाजात तेढ निर्माण करणारे विधान करत असल्याची बनावट चित्रफीत मोबाईल वर स्टेटस ठेवणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात बुधवारी रात्री उशिरा  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पनवेल मधील घोट कॅम्प तळोजा येथे राहणारा मुख्तार नूरमहंमद सैय्यद याने मोबाईल वर पंत प्रधान नरेंद्र मोदी हे संदेश देत असल्याचे स्टेटस ठेवले होते.

मात्र या स्टेट्स मध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून मूळ संदेश सोडून दुसराच संदेश दिल्याचे दिसून आले. पंतप्रधान मोदी यांच्या तोंडी चुकीची धार्मिक विधाने , भारतातील हिंदू धर्मीय लोकांच्या हिंदी समाजाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा तसेच दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने हि चित्रफीत स्टेटस वर ठेवण्यात आला.

हि बाब सीबीडी पोलिसांच्या निदर्शनास आल्यावर सय्यद याला चौकशी साठी बोलावण्यात आले. मात्र त्याने चौकशी पूर्वीच ती चित्रफीत स्टेटस वरून काढून टाकली तसेच मोबाईल मधून डिलीट केली. त्यामुळे पोलिसांनी पंतप्रधान यांची बनावट चित्रफीत समाज माध्यमातून प्रसारित करणे, ज्या मुळे दोन समाजात तेढ निर्माण होईल,  तसेच पुरावा नष्ट करणे  कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

Story img Loader