नवी मुंबईत उद्धव ठाकरे गटाने पोलीस आयुक्तांच्या विरोधात मोर्चा काढला खरा मात्र पोलिसांनी कायद्याचा बडगा उगारत आयोजक आणि तीन महत्वाच्या नेत्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. विशेष म्हणजे सरकारच्या दबावाखाली नवी मुंबईतील उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल करत असल्याचा दावा करीत पोलीस आयुक्तांच्या विरोधात हा निषेध मोर्चा काढला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> खासदार राजन विचारे यांची नवी मुंबई पोलिसांसोबत झाली जोरदार बाचाबाची

राज्य सरकार यंत्रणेचा गैरवापर करीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेने आज (बुधवारी) नवी मुंबईत मेळावा आणि पोलीस आयुक्तांच्या विरोधात मोर्चा काढला होता. यावेळी प्रक्षोभक भडकाऊ भाषणे केल्याने शिवसेना सचिव व खासदार विनायक राऊत, खासदार अरविंद सावंत आमदार भास्कर जाधव विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात पोलीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात प्रक्षोभक भाषा वापरल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा मोर्चा आणि पोलीस आयुक्तालयाला छावणीचे रूप, नेमकं कुठे घडत आहे ?

या व्यतिरिक्त केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचा मुलगा नितेश राणे यांच्या विषयी अपशब्द वापरल्या प्रकरणी आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधात वेगळा गुन्हा दाखल केला गेला.  राणे समर्थक यात फिर्यादी आहे. या शिवाय विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांच्याही विरोधात मुख्यमंत्री व पोलिसांच्या विषयी शिवराळ भाषा आणि प्रक्षोभक वक्तव्य केल्याने गुन्हा दाखल केला गेला आहे. हे तिन्ही गुन्हे सागरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आले आहेत. तर  विना परवानगी मेळावा आणि मोर्चा काढल्या प्रकरणी  आयोजक २० पदाधिकारी आणि सुमारे ७०० कार्यकर्त्यांच्या विरोधात  सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police filed case against four big leaders of uddhav thackeray group along with bhaskar jadhav over provocative remark zws
Show comments