पनवेल : पुणे येथील अपघात प्रकरणानंतर सर्वत्र लेडीज सर्व्हीसबारची झाडाझडती घेण्याचे काम पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू झाले आहे. परंतू अनेक दिवस उलटले तरी पनवेलमधील ऑक्रेस्ट्रा बारच्या नावाखाली डान्सबार चालविणाऱ्यांकडे सरकारी यंत्रणेने लक्ष्य केंद्रीत केले नव्हते.

समाजमाध्यमांवर काहींनी सरकारी अधिकाऱ्यांच्या कार्यतत्परतेवर प्रश्न उपस्थित केल्यावर खांदेश्वर पोलिसांनी गुरुवारी आसूडगाव येथील ‘इंटरनेट’ या लेडीज सर्व्हीस बारवर मध्यरात्री सव्वा एक वाजण्याच्या सुमारास धाड टाकून १२ महिला वेटरांना अश्लील चाळे करताना ताब्यात घेतले. एकाच बारच्या परवान्याखाली अनेक गैरधंदे येथे चालविले जात असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांकडून केला जात आहे. पनवेलमधील आसूडगाव परिसरातील सेक्टर ४ ए येथील तपोवन इमारतीमध्ये ‘इंटरनेट’ नावाचा बार सुरू आहे. यशवंतराव चव्हाण पुणे मुंबई द्रुतगती महामार्गालगत कळंबोली सर्कलच्या हाकेच्या अंतरावर हा बार रात्रभर सुरु असल्याने स्थानिक रहिवाशी वैतागले आहेत. इंटरनेट बारवर यापूर्वी ही नवी मुंबई पोलीसांनी धाड टाकली होती. या बारचे मालक, व्यवस्थापक परवान्यातील अटी पाळत नसल्याचे याअगोदर सुद्धा सिद्ध झाले आहे.

Cyber ​​criminals cheated the people of Nagpur of Rs 141 crore
सायबर गुन्हेगारांनी नागपूरकरांना घातला १४१ कोटींचा गंडा, १३ हजारांवर तक्रारी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
nitin Gadkari fraud loksatta,
नितीन गडकरी यांच्या नावाने १० सराफा व्यावसायिकांची फसवणूक; तोतया सुरक्षा अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा
kalyan rape murder case vishal gawali
Video : शेगावात वैद्यकीय तपासणीनंतर विशाल गवळीची कल्याणकडे रवानगी, मध्यरात्री…

हेही वाचा…आपत्ती व्यवस्थापनासाठी पनवेल पालिका सज्ज

नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिलेल्या खास सुचनेनंतर गुरुवारी रात्री स्थानिक पोलीसांनी पुन्हा एकदा बारमध्ये धाड टाकल्यानंतर तेथील महिला वेटर अश्लिल चाळे करताना पोलिसांच्या निदर्शनास आले. मागील अनेक दिवसांपासून नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांचे खास पथक या बारवर कारवाई करेल अशी अपेक्षा होती. परंतू गुरुवारची कारवाई अनेक दिवसानंतर झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

नवी मुंबईपेक्षा पनवेलमध्ये लेडीज सर्व्हीस बारची संख्या कमी आहे. मात्र मुंबई पुणे द्रुतगती महामार्गालगत आणि अटलसेतू पासून काही अंतरावर कोन गावाजवळ अनेक लेडीज सर्व्हीस बार एकाच ठिकाणी आहेत. येथील लेडीजबार मध्यरात्रीनंतर उशीरा सुरू असतात. त्यामुळे पुण्यावरुन येणाऱ्या गिऱ्हाईकांना पहाटेपर्यंत बारमधील महिलांचे नृत्य पाहून आणि मद्याचा आनंद घेऊन पहाटे मद्याच्या धुंदीत पुण्याला जाता येते. महामार्गावर त्यावेळे मद्यपी वाहनचालक तपासणारी यंत्रणा नसल्याने मद्यपी चालकांचे फावते. त्यामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष स्थानिक पोलीसांचा या बारसंस्कृतीला आशीर्वाद मिळत आहे.

हेही वाचा…सिडकोच्या तळोजातील महागृहनिर्माणात मजूर ठार

मागील अनेक वर्षे याच लेडीज सर्व्हीसबार संस्कृतीमुळे पनवेल बदनाम झाले आहे. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त भारंबे यांच्या कारकिर्दीत परवाने धारक लेडीजसर्व्हीसबारमध्ये सुरू असणारे डान्सबार, कुंटणखाने बंद होतील अशी अपेक्षा होती. परंतू तसे झाले नाही. रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी पुणे येथील अपघात प्रकरणानंतर पनवेलच्या डान्सबारमधील झाडाझडती घेण्याचे धाडस न दाखविल्याने पनवेलमध्ये ‘सर्व काही चालते’, याच पायंड्याने सरकारी अधिकाऱ्यांच्या स्तरावर यंत्रणेचा कारभार सुरू असल्याचे दिसले.

Story img Loader