मोर्चाची सुरुवात आता सेंट्रल पार्क येथून; वाहतुकीतही बदल, अवजड वाहनांना बंदी

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी बुधवारी बेलापूर येथील कोकण भवन येथे काढण्यात येणाऱ्या मोर्चासाठी नवी मुंबई पोलिसांनी पूरेपूर सज्जता पाळली असून ५०० पोलिसांना याठिकाणी तैनात करण्यात येणार आहे. राज्यभर मराठी क्रांती मोर्चाना मिळत असलेला प्रतिसाद पाहता नवी मुंबईतील मोर्चालाही मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी मोर्चाच्या आरंभ स्थळात बदल केला आहे. खारघरच्या उत्सव शिल्प चौकातून सुरू होण्याऐवजी हा मोर्चा आता खारघर सेंट्रल पार्क मैदानाजवळून सुरू होईल. या मोर्चासाठी नवी मुंबई शहरातील वाहतुकीतही बदल करण्यात आले आहेत.

maharashtra assembly election 2024 issue of bullying is effective in campaigning in three constituencies of Marathwada
मराठावाड्यातील तीन मतदारसंघांत गुंडगिरीचा मुद्दा प्रचारात प्रभावी
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
shinde shiv sena got responsibility in Maharashtra state assembly elections 2024 for pune
‘धोका’ टाळण्यासाठी ‘मित्रा’ला साकडे; महायुतीकडून शहरात एकही जागा न लढविणाऱ्या शिवसेनेची (शिंदे) यंत्रणा सक्रिय
BJP counter meeting outside the Jammu and Kashmir Legislative Assembly
जम्मू-काश्मीर विधानसभेबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; मार्शलच्या सहाय्याने सभागृहाबाहेर काढल्यानंतर पाऊल
Controversial statement, Kunbi, political atmosphere, Wani yavatmal
वणी : न घडलेल्या प्रकाराने राजकीय वातावरण ढवळून निघाले; कुणबी समजाबद्दलच्या वक्तव्यात बोलविता धनी कोण?
mp naresh mhaske reveal fact behind cm eknath shinde contesting maharashtra assembly election
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवडणुक लढणार नव्हते, पण…; शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांची माहिती
Ashwini Jagtap statement during Devendra Fadnavis meeting in Kalewadi for Shankar Jagtap campaign
चिंचवड: वाघ गेला, ही वाघीण पिल्लांना एकटं पडू देणार नाही; आमदार आश्विनी जगताप कुणाला उद्देशून म्हणाल्या?
The announcement of action against the rebels in the grand alliance The expulsion decision is also pending from BJP print politics news
महायुतीतील बंडखोरांवर कारवाईची केवळ घोषणाच! भाजपकडूनही हकालपट्टीचा निर्णय प्रलंबित

आतापर्यंत राज्यभर निघालेल्या मराठा समाजाच्या मोर्चामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडला नाही तसेच मोर्चेकऱ्यांकडून बेशिस्तीचेही दर्शन घडले नाही. या पाश्र्वभूमीवर बुधवारी काढण्यात येणारा मोर्चाही शांतता मार्गाने पार पडेल, असा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र, मोच्र्यासाठी जमणाऱ्या हजारोंची संख्या पाहता कोकण भवन परिसरात तसेच शीव-पनवेल महामार्गावर मोठय़ा प्रमाणात वाहतूक  कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी या मोच्र्याचे आरंभ स्थळ बदलले आहे. हा मोर्चा खारघर येथील उत्सव चौकामधून निघणार होता. तो बुधवारी सेंट्रल पार्क येथून सुरू होईल. याशिवाय या मार्गावर काही ठिकाणी अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे. कळंबोली सर्कल पासून शिळफाटाकडे जाणाऱ्या जड अवजड वाहनांना सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजपर्यत अवजड वाहनांना प्रवेशबंदी केली आहे. सीबीडी सर्कल पासून महाकाली चौक, सीबीडी पामबीच मार्गी कोकण भवन कडे येणाऱ्या मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. तर सीबीडी येथून भाऊराव पाटील चौक मार्गे पनवेल जाता येणार आहे. वाहतुकीत बदल करण्यात आल्याने पर्यायी मार्गाचा वापर करुन सहकार्य करण्याचे आवाहन नवी मुंबई पोलीस आयुक्त हेंमत नगराळे यांनी केले आहे. सुमारे पाच हजार वाहने यानिमीत्ताने एकत्र येतील असा अंदाज पोलीसांनी लावला आहे. मोर्चा सुरू होण्याचे ठिकाण पोलिसांनी बदलल्यामुळे मोर्चे करांना २ किलोमीटर अतिरीक्त चालावे लागणार आहे. विशेष म्हणजे उत्सव चौक ते सीबीडी हे अंतर साडेतीन किलोमीटर असल्याने मोर्चेकरांना साडेपाच किलोमीटर चालून पुन्हा पाच किलोमीटर परत चालत यावे लागणार आहे.

पोलिस बंदोबस्त

*  साहाय्यक पोलिस-   ०४

*  पोलिस निरीक्षक-    २४

*  उपनिरीक्षक व सहाय्यक उपनिरीक्षक-   ८९

*  पोलिस-     ९८३

*  राज्य राखीव पोलिस दलाची एक तुकडी मागविण्यात आली आहे.

५० हजाराच्या जमावाची शक्यता

पुणे आणि गोव्याकडे जाणाऱ्या वाहतुकीला कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही, या सबबीखालीच मराठा क्रांती मूक मोर्चाला नवी मुंबई पोलिसांनी परवानगी दिली आहे.

मोर्चाचे सभेत रुपांतर झाल्यानंतर दोन मुली समाजाची व्यथा मांडतील. नवी मुंबईत जास्तीत जास्त असलेल्या मराठा समाजातील माथाडी कामगार असल्याने ही संख्या ५० हजारच्या घरात जाईल, असा पोलिसांचा अंदाज आहे.