राजकीय विरोधक असलेले दोन पक्षांनी एकाच मुद्यावर मनपा आयुक्त सोबत बैठक घेतल्याचे चित्र शुक्रवारी दिसून आले. नेरूळ येथील बालाजी मंदिराच्या मागील भागात डोंगराच्या पायथ्याशी असलेली अनधिकृत झोपडपट्टी नष्ट करावी या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजपा यांनी एकत्रित हि मागणी केली. दोन्ही पक्षांचा मनपात प्रवेश वेगवेगळा प्रवेश झाला मात्र पत्रकार परिषद एकत्र घेत माहिती दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
हेही वाचा >>>नवी मुंबई : राडा रोडा टाकण्याची दादागिरी; अधिकाऱ्यांची गाडी अडवत शिवीगाळ, गुन्हा दाखल
नेरूळ बालाजी मंदिर सेक्टर २८ (नवीन) येथील साहिल सृष्टी आणि शिवतेज प्लाझा इमारतीच्या मागील बाजूस नवी मुंबई महानगरपालिका उद्यान आहे. याच उद्यानाच्या जागेत व लगत परिसरात अनधिकृतपणे असलेली झोपडपट्टी आहे. हि झोपडपट्टी हातावान्यास वारंवार मागणी राजकीय पक्षांनी केली. मात्र मनपा कडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य अथवा कारवाई करण्यात आलेली नाही. असा दावा भाजप महिला सरचिटणीस मंगला घरत यांनी केला आहे. अनधिकृत झोपडपट्टीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी नागरिकांचा भरणा आहे. छोट्या मोठ्या चोऱ्या करणी मारामारी करणे, स्थानिक नागरिकांना धमकावणे, अमली पदार्थाचा व्यवसाय करणे, वेश्याव्यवसाय करणे अशा प्रकारचे अनेक गुन्हे तिथे सर्रास होत असतात. गुरुवारी या ठिकाणी एका तरुणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला गेला. सुदैवाने काही लोक येथे आल्याने बलात्कार करण्याचा प्रयत्न करणारे तीन व्यक्ती याच झोपडपट्टीत पळून गेले अशी माहिती घरत यांनी दिली. या बाबत मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या कडे व्यथा मांडली.
हेही वाचा >>>नवी मुंबई: उष्मा वाढल्याने हापूस तोडणीला लगबग
हाच मुद्दा घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनेने शुक्रवारी सकाळीच आयुक्तांना भेट घेण्याबाबत प्रसिद्धी माध्यमांना कळवले होते. दोन्ही पक्ष आयुक्तांना एकत्रित भेटले. २००६ पासून आम्ही हि झोपडपट्टी हटवण्याची मागणी मनपा कडे करीत आहोत अशी माहिती जिल्हाध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी दिली. याच ठिकाणी काही दिवसांच्या पूर्वी सहा सात तलवारी पोलिसांनी जप्त केल्या होत्या.तसेच गुरवारी एका युवतीचा विनयभंग करण्यात आला असेही मोरे यांनी सांगितले. फ्लँट ओनर्स वेलफेअर असोसिएशन तर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेने आयुक्तांना निवेदन दिले.या बाबत मनपा आयुक्तांनी लवकरात लवकर कारवाई करण्याचे आश्वासन दिले असल्याचे दोन्ही पक्ष प्रतिनिधींनी सांगितले. राजकीय विरोधक असले तरी बेकायदा झोपडपट्टी विरोधात दोन राजकीय पक्षांनी एकत्रित आयुक्तांच्या समवेत बैठक घेतली आणि त्या नंतर पत्रकारांनाही एकत्रितच माहिती दिली. याची चर्चा दिवसभर पालिका वर्तुळात होत होती.
नवी मुंबई मनपा अतिक्रमण विभागाच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी आलेल्या महिला शिष्टमंडळला सुरक्षा मुद्दा हा पोलिसांचा भाग येत असल्याचे सांगत थेट नेरूळ पोलीस ठाण्यात धाडले. मात्र तरीही भाजप महिला शिष्टमंडळाने बेकायदा झोपडपट्टी हा मुद्दा तर पोलीसंनाचा नसून मनपाचा आहे असे खडसावल्यावर तो अधिकारी नरमला व कारवाई करू असे आश्वासन दिले अशी माहिती समोर आली आहे.