थंडीची चाहूल लागताच उरण तालुक्यात मेजवान्यांना बहर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जगदीश तांडेल, उरण

थंडीची चाहूल लागल्यानंतर सध्या खवय्यांना वालाच्या शेंगाच्या पोपटीचेही वेध लागले असतात. मात्र यंदा पाऊस लांबल्याने वालाच्या शेंगांचे उत्पादनच आले नसल्याने उरण तालुक्यातील पोपटी पावटय़ाच्या शेंगावर साजरी केली जात आहे. अर्थात पोपटीत वालाच्या शेंगांची चव पावटय़ांमध्ये नसल्याची बाब अनेकांनी नोंदवली.

वालाच्या शेंगासह सध्या इतर शेंगाचाही समावेश असलेली पोपटी ही थंडीच्या सुरुवातीला मेजवानीच असते, पावसाळा संपताच कडव्या वालांच्या शेंगाचे बी पेरले जात असून हे पीक येण्यासाठी ९० दिवसांचा कालावधी लागतो. उरण तालुक्यात अशा प्रकारचे ४४ हेक्टरवर पीक घेतले जात आहे. या वर्षी झालेल्या अधिकच्या पावसामुळे वालांच्या पिकांना उशीर होत  असून जानेवारी-फेब्रुवारी महिन्याच्या अखेपर्यंत हे पीक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वालाच्या शेंगाची प्रतीक्षा खवय्यांना लागून राहिली असली तरी पावटय़ाच्या शेंगावर भागवावे लागत आहे. सध्या पावटय़ाचा दर ६० रुपये प्रतिकिलो इतका आहे.

वालाचे पीक हे एक उत्पन्नाचे साधन म्हणून उरणमधील शेतकरी भाताचे पीक कापल्यानंतर तातडीने त्याच शेतात हे पीक घेतात. शेतीचा ओलावा असल्याने हे पीक पेरणे सोपे होते.  या पिकाची राखण करण्याची जबाबदारी मोठी असते. या शेंगाची फुले तसेच शेंगा माकडांपासून वाचवाव्या लागतात.  थंडीच्या कालावधीत नैसर्गिक दवाच्या साहाय्याने या पिकाला नैसर्गिक पाणी दिले जाते. त्यामुळेच या वालांची चव काही वेगळीच असते. त्यामुळे खास करून याच वालाच्या शेंगाची पोपटी केली जाते.

मांसाहाराला मागणी

पोपटी ही शाकाहारी व मांसाहारी अशा दोन्ही प्रकारांत केली जाते. ज्यांना शाकाहारी पोपटी हवी असेल त्यांच्यासाठी वाल, चवळीच्या शेंगा, बटाटा आदी टाकून केली जाते. तर सध्या पोपटीमध्ये मांसाहारी पोपटीला अधिक मागणी आहे. यात चिकन, अंडी यांची पोपटी केली जाते.