लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी मुंबई : नवी मुंबईत गणेश विसर्जन साठी शहरात अनेक ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली. मात्र विसर्जनाच्या दुसऱ्याच दिवशी ईदची सुट्टी असल्याने सदर विसर्जन तलाव बेवारस अवस्थेत आहेत. त्यातील बहुतांश ठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्याने कुमारवयीन आणि युवक त्या तलावात डुंबण्याचा आनंद घेत आहेत. मात्र त्यामुळे अपघाताची भीती निर्माण झाली आहे.

प्लास्टिक मुक्त अर्थात पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करण्याचे आवाहन पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार शहरात २२ नैसर्गिक तलावांच्या सोबतच १३७ कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली होती. त्याला प्रतिसाद देत १ हजार ४६५ घरगुती तर ११ सार्वजनिक असे १ हजार ४७६ गणेश मूर्तींचे विसर्जन या तलावात करण्यात आले. रात्रीतून त्यातील विसर्जित गणेश मूर्ती हलवण्यात आल्या. मात्र तलाव तसेच ठेवण्यात आले. त्यात आज (बुधवारी) ईद निमित्तची सुट्टी देण्यात आल्याने मनपा कर्मचारी सुट्टी वर गेले. त्यामुळे अशा कृत्रिम तलावांना वाली उरला नाही . परिणामत: अनेक कृत्रिम तलावात आसपासचे युवक आज सकाळपासून डुंबण्याचा आनंद घेत आहेत. त्यामुळे नुकसान होणार नाही. मात्र चेष्टेत वा अन्य कारणांनी अपघात होऊ शकतो. अशी भीती परिसरातील लोक करत आहेत. आग्रोळी गावातील तलावाच्या शेजारीच असाच कृत्रिम तलाव करण्यात आला आहे.

आणखी वाचा-गरजेपोटी घरांची घोषणा निवडणुकांमध्येच का? प्रकल्पग्रस्तांचा सवाल

या ठिकाणी एकही सुरक्षा रक्षक नाही. त्यामुळे अनेक युवकांनी सकाळ पासून त्यात डुंबण्याचा आनंद घेतला आहे. याबाबत मनपा अधिकाऱ्यांना फोन द्वारे माहिती देण्याचा प्रयत्न केला मात्र कोणीही फोन उचलत नाही. अशी खंत आग्रोळी गावातील एका रहिवाशाने व्यक्त केली. याबाबत सीबीडी बेलापूर विभाग कार्यालयाशी संपर्क करण्यात आला मात्र संपर्क न झाल्याने माहिती मिळू शकली नाही.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Possibility of accidents at artificial ponds mrj