वाशीतील एपीएमसी घाऊक बाजारात गणेशोत्सवामुळे बाजारात बटाटा आवक ही कमी आहे, तसेच ग्राहक ही रोडवले आहेत. त्यामुळे बाजारात बटाटा शिल्लक राहिला असून दरात ही घसरण झाली आहे. आधी १४-१५रुपयांनी उपलब्ध असलेला बटाटा आता १०-१३रुपयांनी विक्री होत आहे.
कांदा बटाटा बाजार समितीत सध्या बटाट्याची आवक कमी होत आहे. गुजरात, मध्यप्रदेश, युपी या परराज्यातुन बटाट्याची आवक सुरू आहे. शुक्रवारी ४९गाड्या दाखल झाल्या आहेत. परंतू गणेशोत्सव मुळे बाजारात ग्राहक कमी येत असल्याने शेतमालाला म्हणावा तसा उठाव नाही, परिणामी बाजारात बटाटा शिल्लक ही राहत आहे. गुरुवारी १५ गाड्या ते शुक्रवारी २०-२५गाड्या शिल्लक राहिल्या आहेत. त्यामुळे दरात घसरण झाली असून उच्चतम प्रतिच्या कांद्यालच उठाव आहे. शनिवारी बटाटा आवक वाढली तर दरात आणखीन घसरण होण्याची शक्यता आहे अशी माहिती व्यापारी महेश राऊत यांनी दिली आहे.