नगरपरिषदेच्या उरण शहर ते मोरा या मार्गावरील जलवाहिनीला उरण न्यायालयाच्या प्रवेशद्वारा समोर गळती लागली असून त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. या गळतीमुळे रस्त्याच्या मध्यभागी असलेले रस्त्याचे फेव्हर ब्लॉक उखडल्याने खड्डा ही पडला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> नवी मुंबई : भिकाऱ्यांना केलेले अन्नदान .. आवडीचे नसेल तर थेट कचऱ्यात..

उरण ते मोरा मार्गाच्या मध्यभागातून नगरपरिषदेची ही जलवाहिनी जात असून बुधवारी या वहिनीला गळती लागली आहे. मात्र अजून पर्यंत दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे मोरा व भवरा परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले असून ते लवकरात लवकर पूर्ण करून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल अशी माहिती उरण नगरपरिषदे चे मुख्याधिकारी संतोष माळी यांनी दिली आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pothole on uran mora road due to leak in uran municipal councils water channel amy