पनवेल: पनवेल महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने भारतीय शेतकरी कामगार पक्षाने कळंबोली उपनगरातील खड्डे पडलेल्या रस्त्याला हार घालून पालिकेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. महापालिकेने लवकरच कळंबोली येथील खड्डे दुरुस्त करणार असल्याचे सांगीतले आहे.कळंबोली उपनगरातील मुख्य रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण महापालिका करणार आहे. यासाठी पालिका ८० कोटी रुपयांपेक्षा अधिकचा निधी खर्च करणार आहे. त्यामुळे डांबरीकरण झालेल्या रस्त्यांवर खड्डे पडल्याने महापालिका त्याकडे दुर्लक्ष करत आहे असा आरोप शेकापच्यावतीने करण्यात आला. गणेशोत्सवात याच खड्यातून नागरिकांनी प्रवास केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पावसाळा संपत आला नवरात्रोत्सव काही दिवसांवर असल्याने खड्यांमुळे वाहनचालकांचे कंबरडे मोडत असल्याने शेकापने डांबरी रस्त्यावरील खड्डे कधी बुजविणार असा प्रश्न पालिकेसमोर उपस्थित केला आहे. कळंबोलीतील नागरिक खड्यांमुळे वैतागले होते. एमजीएम रुग्णालयासमोरील खड्डे हे सर्वाधिक आहेत. भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे माजी नगरसेवक गोपाळ भगत, रविंद्र भगत यांच्यासह महिला पदाधिकारी सरस्वती काथारा यांनी खड्यांनी फुलांचा हार घालून पालिकेच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त केला. महापालिकेचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कटेकर यांनी याबाबत लवकरच खड्डे बुजविण्याचे काम कळंबोली उपनगरात हाती घेऊ असे सांगीतले. सध्या खारघर उपनगरात खड्डे दुरुस्तीचे काम सूरु आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Potholes on roads in panvel municipal corporation area indian farmers workers party garlanded the potholed road in kalamboli suburb amy