पनवेल : रोडपाली येथील उड्डाणपुलावर सतत खड्डे पडत असल्याने सिडको महामंडळाने दोन कोटी रुपये खर्च करुन नूकताच नवीन कॉंक्रीटचा रस्ता बांधला. मात्र गेल्या आठवड्यापासून सुरु झालेल्या पावसाच्या संततधारेमुळे या रस्त्यावर खड्डे पडण्यास सूरुवात झाली. तेव्हा दोन कोटी रुपये गेल्या पाण्यात गेल्याची प्रतिक्रीया उद्योजकांची संघटना असणा-या तळोजा मॅन्युफॅक्चर असोशिएशनने ( टीएमए) दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तळोजा औद्योगिक वसाहतीमधून रोडपाली सिग्नलवर लवकर पोहचण्यासाठी फूडलॅण्ड कंपनीसमोर उड्डाणपुल बांधला. या उड्डाणपुलावर उतरण्याच्या दोन्ही बाजूला खड्डे पडल्याने सिडको मंडळाने येथे रस्ता नव्याने बांधण्याचे काम काढले. काम सूरु असल्याने २५ दिवसांसाठी हा पुल वाहतूकीसाठी बंद ठेवला होता.

हेही वाचा >>>नवी मुंबई : विधिमंडळ अधिवेशन बंदोबस्ताला जाणाऱ्या पोलीसांच्या गाडीचा अपघात 

रस्ता पुढे चांगला होणार या आशेने वाहनचालकांनी २५ दिवस वाहतूक कोंडीतून प्रवास केला. काम पुर्ण झाल्याने नुकताच हा पुल वाहतूकीसाठी सुरु करण्यात आला. मात्र या रस्त्यावरुन वाहतुक सुरु झाल्यावर आणि पाऊस पडल्यावर काही दिवसातच खड्डे पडल्याने टीएमएने आश्चर्य व्यक्त केले आहे.