नवी मुंबईच्या दक्षिण बाजूस बांधण्यात येणाऱ्या १५ हजार गृहनिर्मितीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने सिडकोने थेट ८९ हजार ७७१ घरांच्या महानिर्मितीचा प्रकल्प आराखडा तयार केला असून त्याला केंद्र सरकारच्या नागरी विकास मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे मंगळवारी कल्याणमध्ये मेट्रो मार्गाच्या उद्घाटनाला येणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाची घोषणा होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

येत्या पाच वर्षांत पूर्ण होणारी ही महागृहनिर्मिती खारघर, कळंबोली, सानपाडा, मानसरोवर, खारकोपर या रेल्वे स्थानकाबाहेर व ट्रक बस टर्मिनलजवळ होणार आहे.

सिडकोने महागृहनिर्मितीचा धडाका लावला आहे. खारघर, कळंबोली, तळोजा, द्रोणागिरी आणि घणसोली येथे १४ हजार ६३८ घरांची नुकतीच सोडत काढली. या घरांसाठी दोन लाख ग्राहकांचे मागणी अर्ज आले होते. त्यामुळे महामुंबई क्षेत्रात घर घेणाऱ्यांची संख्या जास्त असल्याचे सिडकोच्या लक्षात आले आहे. त्यामुळे सिडकोने दुसऱ्या महागृहनिर्मितीची घोषणा केली असून यातील ५३ हजार ४९३ घरे ही आर्थिकदृष्टय़ा दुर्बळ घटकासाठी आहेत. ही सर्व घरे ही पंतप्रधान आवास योजनेअंर्तगत राखीव ठेवण्यात आल्याने सिडकोने राज्य शासनाच्या माध्यमातून हा प्रस्ताव केंद्रीय नागरी विकास मंत्रालयाकडे पाठविला होता. त्याला मंजुरी मिळाल्याने मंगळवारी त्याची अधिकृत घोषणा पंतप्रधानाच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेरुळ-उरण रेल्वे मार्गातील खारकोपपर्यंत रेल्वे सेवेचा शुभांरभ करताना सिडकोने ट्रान्झिट ओरिएन्टेट डेव्हलपमेंट करण्याचा सल्ला सिडकोला दिला होता. त्यानुसार सिडकोने बांधलेल्या महामुंबईतील रेल्वे स्थानकांबाहेर पार्किंगच्या नावाने अनेक भूखंड आहेत. त्या ठिकाणी खाली पार्किंग व वर गृहनिर्मितीचा हा प्रकल्प आहे.

सर्वात मोठा गृहप्रकल्प

रेल्वे स्थानकांच्या फोरकोर्ट भागात ही घरे येत्या पाच ते दहा वर्षांत टप्यात होणार आहेत. यातील ५३ हजार ४९३ घरे ही आर्थिकदृष्टय़ा दुर्बल आणि ३६ हजार २८८ घरे ही अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी राखीव असून यासाठी अनुक्रमे अडीच लाख व २ लाख ६७ हजार रुपये अनुदान प्राप्त होणार आहे. सिडकोच्या इतिहासातील हा सर्वात मोठा गृहप्रकल्प आहे.