सिडकोच्या प्रस्तावित स्मार्ट सिटीमध्ये सुनियोजिततेबरोबरच दर्जेदार जीवनशैलीला प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यासाठी विविध अशा ८८ प्रकल्पांची उभारणी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. खारघर परिसरातील नगराची निर्मिती ‘ब्राऊन फील्ड’ सिटीअंतर्गत केली जात असून, नवी मुंबई विमानतळ प्रकल्पात साडेबावीस टक्के भूखंड प्राप्त प्रकल्पग्रस्तांसाठी तयार करण्यात आलेल्या पुष्पकनगर क्षेत्राचा विकास हा ‘ग्रीन फील्ड’द्वारे केला जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सिडकोचे लहान-मोठे ८८ प्रकल्प
* स्मार्ट संस्था
सिडको पुनर्रचना, संगणकीकरण, रिइंजिनीअरिंग, एनआययूए मार्गदर्शन, तज्ज्ञ सल्ला, प्रशिक्षण, मानसिकता बदल, पाच लाखांवरील खर्चाचे थर्ड पार्टी ऑडिट, अंतर्गत तपासणी या स्मार्ट ऑर्गनायझेशनसाठी २१९ कोटी ५० लाख रुपये खर्च.
* पारदर्शकता
सीएफसी सेंटर, ई-ऑफिस, जीआयएस, सॅप, लीगल ट्रॅकिंग सिस्टीम, स्मार्ट हाऊसिंग अलोकेशन, बेकादेशीर बांधकाम प्रतिबंध यंत्रणा, विविध मोबाइल अ‍ॅप, ऑनलाइन आरटीआय सुविधा, ऑनलाइन पेमेंट, अ‍ॅटो डीसीआर, वायफाय अशा २१ सेवांवर सिडको १७० कोटी रुपये खर्च करणार आहे.
* पर्यावरण संपन्नता
संपूर्ण शहरात एलईडी दिवे, स्वच्छ व सांडपाणी प्रक्रियायुक्त पाणी, नेचर पार्क, मॅनग्रोज पार्क, वार्षिक पर्यावरण अहवाल, ध्वनिप्रदूषण नियंत्रण आणि पाण्याची गळती यांसारख्या पर्यावरण बाबींवर सिडको ४१८ कोटी रुपये खर्च करणार आहे.
* स्वच्छ भारत
शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी मेडिकल हिस्ट्री रेकॉर्ड, ६० गावांचे घनकचरा व्यवस्थापन, नवीन सांडपाणी प्रक्रिया केंद्र अशा सात उपाययोजनांवर ३७८ कोटी ७५ लाख रुपये खर्च करणार आहे.
* दर्जेदार जीवन शैली
बेलापूर किल्लाचे संवर्धन, सीसी टीव्ही कॅमेरे, वाहतूक सुधारणा, ७३ उद्याने, ३३ मैदाने विकास, खांदेश्वर प्लाझा, वॉटर फ्रंट, गाढी नदीच्या सुशोभीकरणावर ६३५ कोटी रुपये खर्च.
* सर्वसामावेश नियोजन
अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी ५५ हजार किफायतशीर घरे, स्मार्ट व्हिलेज योजना, विरुंगळा केंद्र, पोर्ट आणि विमान परिचलन प्रशिक्षण केंद्र, २६ कलमी प्रकल्पग्रस्त विकास कार्यक्रम यावर दहा हजार ९११ कोटी रुपये खर्च .
* पायाभूत सुविधा
सागरी रस्ते, पामबीच मार्ग विस्तार, बालगंगा धरण (४५० कोटी रुपये मदत), कोंडाणे धरण (शासनाकडे मागणी), हेटवणे धरण (क्षमता वाढविणार), बारवी धरणासाठी आर्थिक सहकार्य, जलवाहतूक, सायकल ट्रक, हेलीपॅडसाठी सात हजार ४८४ कोटी रुपये येत्या पाच वर्षांत खर्च केले जाणार आहेत.
* परिवहन सेवा विकास
पनवेल रेल्वे स्थानकाचा टर्मिनल्स विकास, बेलापूर-सी वूड रेल्वे, पनवेल-कर्जत रेल्वे, ठाणे-तुर्भे रेल्वे रुंदीकरण, बससेवा सुधारण्यासाठी सहकार्य, मेट्रो विस्तार अशा परिवहन सेवेवर १३ हजार कोटी खर्च.

वर्षभरापासून सिडकोतर्फे या स्वतंत्र ‘स्मार्ट सिटी’ची तयारी सुरू आहे. आर्थिक स्वयंपूर्णतेमुळे सिडकोला सुंदर आणि केंद्र सरकाला अभिप्रेत असलेले स्मार्ट शहर उभारणे कठीण जाणार नाही. सर्व ८८ प्रकल्पांच्या पूर्णत्वाच्या वेळा निश्चित करण्यात आल्याने हा एक पथदर्शी प्रकल्प ठरणार आहे.
– संजय भाटिया, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक