नवी मुंबई: नवी मुंबईतील प्रस्तावित सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज प्रकल्पाचे सादरीकरण आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या दालनात केले गेले आहे. त्यामुळे हे रुग्णालय आणि महाविद्यालय सुरु करण्याचा एक महत्वाचा टप्पा पार पडला आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी मुंबईत अनेक सुपर स्पेशालिटी रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय आहेत. मात्र ते सर्व खाजगी असल्याने उपचार खर्च वा शिक्षण खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेरील आहे. त्यातून सरकारी महाविद्यालय आणि सुसज्ज सुपरस्पेशालिटी रुग्णालयाची गरज भासत होती. याच अनुषंगाने बेलापूर आमदार मंदा म्हात्रे यांनी पुढाकार घेत सदर रुग्णालय व महाविद्यालयास जागा मिळवण्यासाठी प्रत्यत्न केले. काही महिन्यापूर्वी जागा निश्चिती झाल्यानंतर बुधवार नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त  राजेश नार्वेकर यांच्या दालनात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजच्या प्रकल्पाचे सादरीकरण केले. सदरचा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज प्रकल्प हा ८.४० एकरामध्ये उभारला जाणार असून अंदाजे ८१९. ३०  कोटी खर्च अपेक्षित आहे. यासाठी सी एस आर निधींचाही प्रयत्न केला जाणार आहे. 

आणखी वाचा- नवी मुंबई वाहतूक पोलिसांचा कारवाई धडाका

एकूण ५०० खाटांचे हे रुग्णालय असून  तळ मजला अधिक ९ मजली असणार आहे. या ठिकाणी कर्करोग हृदय रोग, मेंदू अश्या अनेक  मोठमोठ्या आजारांवर उपचार केले जाणार आहेत. सदरच्या क्षेत्रफळामध्ये पीजी/नर्सिंग शैक्षणिक वसतिगृह, पदव्युत्तर शैक्षणिक संकुल, अभियांत्रिकी यार्ड, रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईकांना राहण्याकरिता धर्मशाळा, नर्सिंग वसतिगृह, अभ्यागत केंद्र, पदव्युत्तर विद्यार्थी वसतिगृह, वाहनतळ व इतर अनेक सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच सदर उभारल्या जाणाऱ्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजवर पूर्ण नियंत्रण हे नवी मुंबई महानगरपालिकाचे असणार आहे व सदर प्रकल्पामध्ये अजून काही सुविधा व उपाय करता येईल का असे आदेश महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

या बाबत आमदार म्हात्रे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. सदर प्रकल्प हा महापालिका आयुक्त  राजेश नार्वेकर, सिडको व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी व नवी मुंबई महानगरपालिका, सिडको मधील संबंधित अधिकाऱ्याच्या प्रयत्नांमुळे उभा राहणार आहे. लवकरच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज उभारणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Presentation of the project of super specialty hospital and medical college in municipality mrj