नवी मुंबई: शहरात पोलीस असल्याचे भासवून अंगावरील दागिने , रोकड तपासणीच्या नावाखाली घेऊन पसार होणारे प्रकार घडत आहेत. त्यात जेष्ठ नागरिकांना ही टोळी लक्ष्य करीत असल्याने घरातील जेष्ठ नागरिकांना न घाबरता मात्र काळजी घेत चला असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पुढे हत्या झाली आहे, नियमित तपासणी सुरु आहे, दागिने सांभाळून ठेवा असे विविध कारण सांगून स्वतः पोलीस असल्याचे भासवून फसवणूक करणारे लोक फिरत आहेत. हे लोक बहुतांश वेळेस जेष्ठ नागरिकांना आपले लक्ष्य बनवतात. असाच प्रकार नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाणे हद्दीत घडला आहे.
ऐरोली सेक्टर ४ येथे राहणाऱ्या ६३ वर्षीय निर्मला गायकवाड यांना मधुमेहाचा त्रास होत असल्याने त्या डॉक्टरकडे नियमित तपासणीसाठी गेल्या होत्या. ही तपासणी करून घरी पायी परतत असताना ऐरोली सेक्टर १६ येथून जात असताना दोन अनोळखी इसमांनी त्यांना अडवले. त्यातील एका व्यक्तीच्या अंगावर खाकी पॅन्ट आणि खाकी शर्ट होता तर दुसऱ्या व्यक्तीच्या अंगावर पांढरा टी शर्ट आणि निळी जीन्स पॅन्ट होती. त्यांनी दागिने पर्स मध्ये ठेवा तपासणी सुरु आहे. असे त्यांना अगदी पॉलिसी भाषेत सांगितले. त्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने त्यांनी निर्मला यांच्या हातातील प्रत्येकी सव्वा तोळे वजनाच्या चार बांगड्या स्वतः जवळ घेत दुचाकीवरून निघूनही गेले.
ही प्रक्रिया एवढी वेगात घडली कि निर्मला यांना काही सुधारले नाही. काही वेळाने थोडे भानावर आल्यावर त्यांनी याबाबत आपल्या मुलांना घटनेची माहिती दिली. मुलांच्या मदतीने निर्मला यांनी दीड लाख रुपयांची फसवणूक झाल्या प्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.