नवी मुंबई – वाशीतील एपीएमसी घाऊक भाजीपाला बाजारात उन्हाळा सुरू होताच भाज्यांच्या दरवाढीला सुरुवात होते. कडक उन्हामुळे होणारे भाज्यांचे उत्पादन घटते, त्यामुळे बाजारात कमी आवक होते, परिणामी जादा मागणी पुरवठा कमी होत असल्याने दरवाढ होण्यास सुरुवात होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

घाऊक बाजारात फरसबी, अद्रक, कोथिंबीर महागली असून फरसबी प्रतिकिलो १२० रुपयांवर, तर अद्रक प्रतिकिलो १३५ रुपयांवर गेले आहे.
हिवाळ्यात भाज्यांचे उत्पादन अधिक होत असते. त्यामुळे थंडीमध्ये बाजारात भाजीपाल्याची आवक अधिक असते. जवळजवळ ६०० ते ६५० गाड्या दाखल होत होत्या. आता मात्र उन्हाळा सुरू होताच भाज्यांची आवक घटत आहे.

हेही वाचा – महापालिका सीबीएसई शाळांची २४० जागांसाठी सोडत, वयोगट आणि १ ते ३ किमी परिघातील विद्यार्थ्यांना प्राधान्य

शुक्रवारी बाजारात ५१७ गाड्या दाखल झाल्या आहेत. कडक उन्हाळा सुरू झाल्याने भाज्यांची दरवाढ झाली आहे, असे मत घाऊक व्यापारी रामदास कदम यांनी व्यक्त केले. उन्हाळ्यात भाज्यांचे उत्पादन कमी होते असेही त्यांनी सांगितले. फरसबी, अद्रक, कोथिंबीरच्या दरात अधिक वाढ झाली आहे. एपीएमसी बाजारात अवघी ४८ क्विंटल फरसबी दाखल झाली आहे. फरसबीच्या दरात २० ते २५ टक्के दरवाढ झाली असून, आधी ६० ते ८० रुपांयवरून आता ६० ते १२० रुपयांनी विक्री होत आहे.

हेही वाचा – नवी मुंबई मेट्रोसाठी सिडकोचा मेट्रो निओ पर्याय

अद्रकला बाराही महिने मागणी असते. परंतु, अद्रकची आवकही घटली आहे. ६९७ क्विंटल दाखल झाले असून, आधी प्रतिकिलो ६० ते ७० रुपये दर होते, आता ९० ते १३५ रुपयांनी विक्री होत आहे. एपीएमसी बाजारात नाशिक आणि पुण्यातील कोथिंबीर दाखल होते. सध्या नाशिक येथील कोथिंबीर कमी प्रमाणात दाखल होत आहे, त्यामुळे दरात वाढ झाली आहे. बाजारात कोथिंबीरची १८४७०० क्विंटल आवक झाली असून, नाशिकची कोथिंबीर आधी प्रति जुडी १५ ते २० रुपये होती, आता तिची किंमत २५ ते ३० रुपयांवर गेली आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Price hike of vegetables in navi mumbai ginger coriander became expensive ssb