नवी मुंबई: खारघर उपनगरामध्ये गुरुवारी दुपारपासून मोदीमय वातावरण झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभेत मोदींचे विचार ऐकण्यासाठी पनवेल, उरण आणि नवी मुंबईसह, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील विविध मतदारसंघातून भाजप महायुतीचे भाजपचे हजारो कार्यकर्ते खारघरमध्ये दाखल झाले. वंदे मातरम, जय श्रीराम अशा विविध घोषणा देत हे कार्यकर्ते दाखल होत होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
खारघर उपनगरातील सेक्टर २९ येथील मोकळ्या मैदानात ही सभा होणार असल्याने या ठिकाणी आयोजक आणि सुरक्षा यंत्रणेशिवाय अन्य कोणीही फीरकू नये अशी चोख व्यवस्था नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस दलाने नेमली होती. सभेसाठी येणा-या कार्यकर्त्यांना ज्या बसगाड्यातून आणले त्या बसगाड्यांना फक्त जे. कुमार चौकापर्यंतच येण्याची सूचना पोलीसांनी अगोदरच दिली होती. त्यामुळे कार्यकर्ते बसगाड्यातून उतरल्यानंतर त्यांना प्रचारसभेतील मंडपापर्यंत जाण्यासाठी पायी एक किलोमीटरचे अंतर पार करावे लागले. चार वाजेपर्यंत भाजपच्या कार्यकर्त्यांचा मंडपापर्यंतचा येण्याचा ओघ सूरुच होता. महिला कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात दिसत होत्या. यावेळी कार्यकर्त्यांच्या खांद्यावर भाजपचा झेंडा, गळ्यात कमळ चिन्हाचा शेला आणि डोक्यात भाजप भगव्या रंगाची टोपी घालून हे कार्यकर्ते भाजप जयघोषाच्या घोषणा देत जात होते. मंडपात जाणा-या महिलावर्गाला आणि पुरुष वर्गाला तपासणीसाठी पोलीसांनी स्वतंत्र सूरक्षा यंत्रणा नेमली होती. ४५ मेटल डीटेक्टरच्या साह्याने प्रत्येकाची तपासणी करुन अंगझडतीमध्ये तंबाखूपुडी, हातात सोन्याचे कडे, विडी, काडेपेटी असे रोज वापरणा-या साहीत्याशिवाय कार्यकर्त्यांना मंडपात झडती घेऊनच पोलीस मंडपात पाठवत होते. यामुळे पोलीसांना भाजपचे कार्य कर्ते साहीत्यासोबत जाऊ द्या यासाठी विनवणी करताना दिसत होते. भाजपचे झेंडे मंडपात घेऊन जाण्यासाठी मुभा होती. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह आणि शौचालय तसेच पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती.
हेही वाचा : पंतप्रधानांच्या आगमनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत सरकारची स्वच्छ खारघर मोहीम सुरूच
नरेंद्र, देवेंद्रच्या टोप्यांनी लक्ष वेधले
भाजपचे अनेक उत्साही कार्यकर्ते टोप्या परिधान करुन मंडपाकडे जात असताना महिलांनी घातलेल्या नरेंद्र, देवेंद्र तसेच भाजप लिहिलेल्या टोप्यांनी अनेकांच्या भुवया उंचावल्या. यापुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशी कुजबुज कार्यकर्त्यांमध्ये होती.
विकासकामांची उपनगरात फलकबाजी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी खारघरमध्ये येत असल्याने मोठ्या प्रमाणात भाजपने शहरातील फलकांवर राज्य सरकारने मागील अनेक महिन्यात केलेल्या विकासकामांची माहिती फलकबाजीतून दिली. लाडकी बहिण व इतर योजनांची माहिती कार्यकर्त्यांना व्हावी यासाठी हा प्रचार करण्यात येत होता.
पोलिसांचा झाडाच्या सावलीत श्रम परिहार
पंतप्रधानांचा कार्यक्रम दुपारी तीन वाजता सूरु होईल असे अपेक्षित होते. मात्र दुपारी तीन वाजेपर्यंत कार्यक्रम सूरु न झाल्याने ऊन डोक्यावरुन पुढे गेले तरी सूरक्षेसाठी तैनात पोलीसांना जेवण मिळाले नव्हते. अखेर जेवणाची गाडी आली आणि भुकेने व्याकुळ झालेल्या पोलीसांनी झाडाच्या सावलीत मिळेल तेथे जागा धरुन श्रमपरिहार केला.
वैद्यकीय सोय
२५ हजार कार्यकर्ते एकाच ठिकाणी जमणार असल्याने कार्यकर्त्यांच्या वैद्यकीय मदतीसाठी येथे वैद्यकीय मदत कक्ष अनेक ठिकाणी उभारण्यात आले होते.