पनवेल : मुंबईतील नोकरदारवर्ग कोकणात गणेशोत्सवासाठी निघाला असून एसटीसाठी आगाऊ  नोंदणी संपल्याने त्यांना खासगी बसवर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र याचा फायदा घेत दोन ते तीनपट भाडेआकारणी करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पनवेल बस आगारातून कोकणात जाण्यासाठी मंगळवारी २८ स्वतंत्र बसगाडय़ा सोडण्यात आल्या होत्या. तर २८ पैकी १२ बसगाडय़ांची आगाऊ नोंदणी झाली होती. त्यामुळे मोठी गर्दी झाली होती. बसमध्ये जागा न मिळाल्याने ऐनवेळी प्रवाशांनी  महामार्गावरून मिळेल ते वाहन पकडून जावे लागले. मात्र या ठिकाणी खासगी बसचालकांकडून १००० ते अडीच हजापर्यंत तिकीट दर आकारणी करण्यात येत होती. हा सर्व प्रकार एसटी कर्मचाऱ्यांच्या समोर सुरू होता, मात्र एसटी बस संख्या अपुरी असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

एसटीचे दर

* पनवेल-खारेपाटण : ६०० रुपये.

* पनवेल-रत्नागिरी : ४६५ रुपये.

* पनवेल-देवरुख : ४१५ रुपये.

* पनवेल-सावंतवाडी : ६८० रुपये.

* पनवेल-कुडाळ : ६५५ रुपये.

* पनवेल-दापोली : २७८ रुपये.

* पनवेल-श्रीवर्धन : २६१ रुपये.

* पनवेल-चिपळूण : ३२१ रुपये.