शिवजयंतीनिमित्त शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने शुक्रवारी उरण शहरातून मिरवणूक काढली होती.यावेळी विविध प्रकारचे विषय घेऊन शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणाऱ्या चित्ररथांच्या स्पर्धाचेही आयोजन करण्यात आलेले होते. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा करून ढोल-ताशांच्या व लेझिमाच्या तालावर नाच करीत या मिरवणुकीत सहभाग घेतला होता. त्यामुळे शिवजयंती मिरवणुकीचे उरणच्या नागरिकांकडून स्वागत केले जात होते. यावेळी चित्ररथ स्पर्धेतील विजेतांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
मिरवणूक राघोबा मंदिर कोटनाका,जरी मरी मंदिर, खिडकोळी नाका, पालवी रुग्णालय, कामठा रस्ता, गणपती चौक, विमला तलाव अशी काढण्यात आली होती. शेवटी विमला तलावातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार करून शिवाजी महाराज की जय अशा जोरदार घोषणा देत शिवाजी महाराजांना वंदन करण्यात आले. मिरवणुकीत उरण तालुक्यातील विविध विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विद्यालयाचा चित्ररथ तयार केला होता. त्यात शिवराज्याभिषेक, शिवाजी महाराजांचा जन्म, स्वराज्याची प्रतिज्ञा तसेच शिवाजी महाराज, खंडोबा तसेच भवानी, युद्धाची स्थिती यांचेही चित्ररथ तयार करण्यात आलेले होते. रॅलीमध्ये विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिक, महिला व तरुणांचाही सहभाग होता. अनेक ठिकाणी उरणमधील नागरिकांनी या मिरवणुकीवर पुष्प वर्षांव करीत स्वागत केले. यावेळी एकूण १९ चित्ररथांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता.
उरणमध्ये शिवजयंतीनिमित्त चित्ररथ मिरवणूक
शिवजयंतीनिमित्त शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने शुक्रवारी उरण शहरातून मिरवणूक काढली होती.
Written by लोकसत्ता टीम
आणखी वाचा
First published on: 20-02-2016 at 02:01 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Procession in uran on the occasion of shiv jayanti