शहरातील , खारफुटी, कांदळवन , मोकळ्या भूखंडावर अनधिकृतपणे टाकल्या जाणाऱ्या राडारोड्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘डेब्रिज ऑन कॉल’ तसेच ‘भरारी पथक कारवाईच्या माध्यमातून तुर्भे येथे राडारोड्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. या प्रकल्पातुन आतापर्यंत ३० हजार मेट्रिक टन राडारोड्यावर प्रक्रिया करण्यात आली असून त्यातून ४ लाखहुन अधिक पेव्हरब्लॉक निर्मिती करण्यात आलेली आहे.

हेही वाचा >>> नवी मुंबईतील उच्च विद्युत वाहिन्याखालील नर्सरीच्या आडून बेकायदा कारभाराचे चांगभले

नवी मुंबई महापालिका घनकचरा व्यवस्थापनात देशातील अग्रगण्य शहर म्हणून राष्ट्रीय स्तरावर नावाजले जात असताना शहरात विनापरवानगी कुठेही टाकण्यात येणाऱ्या राडारोडामुळे शहर सौंदर्यीकरणाला खिळ बसत होती. पालिका स्तरावर यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच राडारोड्याची व्हिलेवाट लावून त्यापासून उपयुक्त वस्तू निर्मिती करण्याचा प्रकल्प सन २०१९मध्ये उभारण्यात आला. शहरातील मोकळ्या भूखंडावर राडारोड्याचे होणारे अतिक्रमण थांबविण्यासाठी राडारोडा नियंत्रक भरारी पथके नेमण्यात आली होती. मात्र तरीदेखील शहरात राडारोडा मोकळे भूखंड, रस्ताच्या कडेला कुठेही टाकण्यात येत होता. त्यामुळे डेब्रिज ऑन कॉलची सुविधा उपलब्ध करून निर्मिती होते त्याच ठिकाणाहुन राडारोडा उचलण्यात येत आहे. तुर्भेतील कचराभूमीच्या बाजूला असलेल्या ३४ एकर जमिनिपैकी ३.५ एकर जमिनीवर हा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे . या प्रकल्पासाठी ७ कोटी ३८ लाख ९२ हजार ९३४ रुपये खर्च करण्यात आलेला आहे. या प्रकल्पाअंतर्गत राडारोडा कचरा प्रक्रिया मशीनमधून प्रतितास २० टन राडारोड्यावर प्रक्रिया होते. या मशीनची दिवसाला १०० ते १५० टनांपर्यंतच्या राडारोड्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. सद्यस्थितीत शहरातील सरासरी ३० ते ३५ मे.टन राडारोड्या वर प्रक्रिया करण्यात येत आहे. त्यातून खडी, रेती आणि पेव्हर ब्लॉक तयार करण्यात येत आहेत.

आतापर्यंत डेब्रिज प्रक्रिया- ३०हजार मेट्रिक टन
पेव्हर ब्लॉक निर्मिती आणि वापर – ४लाख १४ हजार ३३६
रेती – ७६८२ मेट्रिक टन
खडी – ९३९५मेट्रिक टन

Story img Loader